health insurance | आरोग्य विमा खरेदी करताना काय पहावे ? चला तर मग जाणून घेऊयात काही महत्वाच्या गोष्टी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : health insurance | वाढत्या महागाईच्या काळात हेल्थ इन्शुरन्स (health insurance policy) आरोग्य विमा हा खरं तर खुप महत्वाचा विषय आहे.भारतीय लोकांमध्ये आरोग्य विम्याची सवय किती आहे असं जर विचारलं तर कोरोना आधीच्या काळात ही सवय खूपच कमी होती.परंतू याचे महत्व कोरोनाच्या संकट काळात जास्त अधोरेखित झाले.कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटामुळे उपचारात अडचणी आल्या.आरोग्य विमा कंपन्यांनी (health insurance companies) कोरोना काळात स्पेशल कोरोना आरोग्य विमा पाॅलिसीचे अनेक नवीन प्लॅन (health insurance plans) बाजारात आणले.अनेकांनी या विमा पाॅलिसी (insurance policy) विकत घेतल्या.त्याचा फायदाही अनेकांना झाला.आरोग्य विमा पॉलिसी विकत घेण्याकडे आता अनेकांचा कल वाढला आहे.

चर्चेतल्या बातम्या

भारतात आरोग्य सेवा अत्यंत महागडी आहे. खाजगी रूग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बीले आकारली जातात.यातून रूग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट होते. आता प्रत्येक नागरिकांकडे स्वता:ची आरोग्य विमा पाॅलिसी असणे याकडे कल वाढला आहे. आजकाल विविध आजार बळावत आहेत. त्यावरील उपचारासाठी विमा पाॅलिसी अनेकांना आधार ठरत आहेत.कोरोना काळात आरोग्य विमा किती फायदेशीर ठरू शकतो ही बाब अनेकांच्या लक्षात आली आहे.

नागरिक आरोग्य विमा खरेदी घेण्याकडे आकर्षित होताच बाजारात अनेक नव्या आरोग्य विमा कंपन्यांनी (new health insurance companies) शिरकाव केलेला आहे. तर जुन्या आरोग्य विमा कंपन्यांनी अनेक नवनवीन प्लॅन बाजारात आणले आहेत.ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बाजारात मोठी स्पर्धा आहे. आरोग्य विमा पाॅलिसीच्या प्लॅनचे मार्केटिंग जोरात केले जात असल्याने नागरिक याला भूलत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

आरोग्य विमा पाॅलिसी घेताना आपण आकर्षक मार्केटिंगला न भूलता काही गोष्टी आवर्जून पाहणे आवश्यक असते. (what to look for when buying a health insurance) त्या गोष्टींची पडताळणी न करता आर्थिक गुंतवणूक केल्यास ऐनवेळी आपली फसवणूक होण्याचा धोका अधिक आहे.

त्यामुळे आपण आज काही गोष्टी समजवून घेऊयात. जेणेकरून आरोग्य विमा पाॅलिसी घेताना फसवणूक तर होणार नाही शिवाय आपण (कदाचित) रूग्णालयात दाखल झाल्यावर आपल्या आरोग्य खर्चाचे फायदे विमा कंपनीच्या पाॅलिसीतून भागवले जाण्यास मदत होईल. (Buying health insurance? Here are some important things to know to avoid fraud)

हेल्थ इन्शुरन्स बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजार आणि रोग. असे बरेच रोग (disease) आहेत, जे हेल्थ इन्शुरन्समध्ये समाविष्ट केले जात नाहीत. म्हणूनच, त्या रोगांबद्दल आपण आधीच नीट विचारून घेतले पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वापरण्याची आवश्यकता असेल, तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

अशा परिस्थितीत, कोणकोणते रोग यात समाविष्ट आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.विमा कंपन्यांनी वेळोवेळी जारी केलेल्या अद्यावत माहितीची पडताळणी विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करा किंवा विमा एजंटकडे तश्या स्वरूपाच्या कागदपत्रांची मागणी करा. योग्य खात्री झाल्यावरच गुंतवणूकीचा निर्णय घ्या. जर मनात थोडी जरी शंका असेल तर नवीन पर्यायाचा विचार करा. जोवर खात्री होत नाही तोवर अजिबात गुंतवणूक करून नका.

कोणत्या आजारावर किती क्लेम हे आधी समजून घ्या

विमा पॉलिसीमध्ये गंभीर आजारासाठी क्लेमची रक्कम जास्त असावी. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक विमा कंपन्यांच्या धोरणांमध्ये, काही गंभीर आजारांवरील क्लेमची रक्कम तुलनेने कमी असते. विमा पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाला याची माहिती असावी. यासाठी ग्राहकाने गंभीर आजाराच्या कवर यादीसह सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

रूग्णालयात भरती झाल्यावर हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसीचा नेमका कसा फायदा होणार? (health insurance policy benefit hospitalized?)

रुग्णालयात भरतीसाठी लागणाऱ्या संपूर्ण विमा पॉलिसीची निवड करणे ग्राहकांसाठी नेहमीच चांगले असते. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये पॉलिसीधारकास एका मर्यादेनंतर वॉर्ड किंवा आयसीयूचे बिल स्वत:लाच भरावे लागते. त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाला याची माहिती असावी. त्यामुळे पाॅलिसी घेताना रूग्णालयात भरती झाल्यावर पाॅलिसीचा फायदा कसा मिळणार याची संपूर्ण माहिती घ्या.मगच पुढचा निर्णय घ्या.

एकाच वेळी प्रीमियम भरल्यास सूट

बाजारात उपलब्ध असणार्‍या बर्‍याच विमा पॉलिसींना जास्तीत जास्त पॉलिसीच्या मुदतीत एकरकमी प्रीमियम भरण्यापासून सूट दिली जाते.पॉलिसीची मुदत जास्तीत जास्त तीन वर्षे असू शकते. प्रीमियम एकत्र जमा करुन ग्राहक या सूटचा लाभ घेऊ शकतात.

सध्याचा आजार पाॅलिसीत कव्हर होतोय का हे आधी तपासा

आरोग्य विमा घेताना सध्याच्या आजारासाठी विमा कवच आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. काही कंपन्या त्यांच्या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा तत्कालीन आजारासाठी कवर देतात आणि काही देत नाहीत. ज्या ग्राहकांना सध्याच्या आजारासाठी कवर देतील आणि प्रतीक्षा कालावधी कमी असेल, अशा आरोग्य विम्याची निवड करावी.

को-पेमेंट क्लॉज

को-पेमेंट म्हणजे पॉलिसीधारकाने विमाधारक सेवांसाठी जे स्वतः पैसे द्यावे लागतात. ही रक्कम आधीच ठरलेले असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या बहुतेक विमा पॉलिसी को-पेमेंटच्या अटीसहच असतात. अशा परिस्थितीत ग्राहकाने विमा पॉलिसीची निवड केली पाहिजे ज्यामध्ये त्याला कमीत कमी को-पेमेंट द्यावे लागेल. या व्यतिरिक्त ग्राहक को-पेमेंटची अट काढून टाकण्याचा पर्याय देखील निवडू शकतात. यासाठी ग्राहकाला जादा प्रीमियम भरावा लागेल.

विमा एजंटच्या भूलथापांपासून सावध रहा

आरोग्य विमा क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या व्यवसाय वाढीसाठी विमा एजंटला आकर्षक कमीशन, इन्सेंटिव्ह देतात. याचा फायदा उचलण्यासाठी विमा एजंट ग्राहकांना भूलथापा देऊन पाॅलिसी विकत घेण्यासाठी भाग पाडतात. विशेषता: जे विमा एजंट असतात ते आधी आपल्या मित्र, नातेवाईक, कुटूंबातील सदस्यांना पाॅलिसी विकतात. आपणही डोळे झाकून विश्वासाने पाॅलिसी विकत घेतो. परंतू  विमा एजंटकडून जे फायदे सांगितले जातात त्याची आधी खात्री करणे कधीही हिताचेच असते. जोवर विमा कंपन्यांचे सर्व नियम समजुन घेत नाहीत तोवर ठोस निर्णयावर येऊ नका.

शॉर्ट टर्म फायद्यापेक्षा लाँग टर्म फायद्याचा विचार करा 

विमा पाॅलिसी किंवा कुठलीही आर्थिक गुंतवणुकीची योजना जेव्हा बाजारात आणली जाते तेव्हा बाजारात आकर्षक योजनांचा भडीमार केला जातो. याला बळी पडून आपण फसलो जाण्याचा धोका अधिक आहे. यामुळे प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणे जितके महत्वाचे आहे.तितकेच ती माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवणे ही कंपनीची व तिच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते.पण विमा एजंट बहुतेकदा मुळ माहिती लपवून आकर्षक प्रलोभनाची माहिती सांगुन ग्राहकाला आकर्षित करतात. यात शॉर्ट टर्म फायदा पाहिला जातो. हे कंपनी व ग्राहक दोघांसाठी घातक आहे.

विमा पाॅलिसी प्लॅनची माहिती जाणून घेण्यासाठी गुगलचा वापर करा 

जामखेडचे विमा सल्लागार बाळासाहेब वराट सांगतात की, ग्राहकाने हेल्थ इन्शुरन्स (health insurance) खरेदी करताना स्वता:ची फसवणूक टाळण्यासाठी इंटरनेटचा वापर करून विमा कंपनीची (health insurance companies) माहिती तसेच विमा एजंट (Insurance agent) सांगत असलेल्या विमा पाॅलिसीच्या प्लॅनची (health insurance plans) सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठीच्या अचूक माहितीसाठी गुगल व युट्यूबवर (google, YouTube) माहिती उपलब्ध होते.त्याचा अभ्यास करूनच पुढील योग्य निर्णय घ्यावा.

पुर्वी माहिती मिळवण्याचे साधणे नव्हते आता अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या हातात आला आहे. त्याचा वापर करून मोबाईलवर कुठलीही माहिती सहज उपलब्ध होते. त्यातून चांगली आरोग्य विमा कंपनी कोणती ? (which health insurance companies are the best) हे शोधणे सोप्पे झाले आहे.खात्री करूनच आरोग्य विमा कोणता निवडावा हे ठरवावे. आरोग्य विमा खरेदी करताना कोणत्या घटकांचा विचार करावा ? (What factors to consider when buying health insurance) हे एकदा समजुन घेतल्यानंतरच आरोग्य विमा पाॅलिसी खरेदी करणे ग्राहकांच्या जास्त फायद्याचे आहे असे वराट सांगतात.