Heavy rains in Maharashtra | ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मुसळधार पाऊस

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला मुसळधार पावसाचा इशारा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : heavy rains in Maharashtrath | राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ऑक्टोबर हिटने (October hit ) डोके वर काढले आहेत. तापत्या उन्हाने उकाड्यात वाढ झाली आहे. गुलाब चक्रीवादळानंतर शाहीन चक्रीवादळामुळे (Shaheen Cyclone) मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे.

राज्यात पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख ( punjab dakh Havaman andaj) यांनी व्यक्त केला आहे.

परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेले हवामान अभ्यास पंजाब डख यांनी पावसासंबंधी आजवर जे जे हवामान अंदाज वर्तविले आहेत. ते तंतोतंत खरे ठरत असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे.

यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाचे पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाकडे सातत्याने लक्ष असते.

पंजाब डख यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 03 ते 05 ऑक्टोबर या कालावधीत सूर्यदर्शन होऊन पाऊस कमी होईल परंतु काही भागात स्थानिक हवामानानुसार हलका ते मध्यम पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे.

तर दिनांक 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 14,18 ऑक्टोबर यादिवशी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.यामध्ये दिनांक 6 ते 9 या चार दिवसांत मुसळधार पाऊस होणार आहे.

पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.परंतू काही भागात पावसाची रिमझिम हजेरी असेल असेही सांगण्यात आले आहे.

राज्यात 06 ते 09 ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार होणार असल्याने सर्व जनतेने सर्तक रहावे व नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन पंजाब डख यांनी केले आहे.

राज्यातील छोटी मोठी धरणे यंदा भरणार आहेत.ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यात पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. (heavy rains in Maharashtrath)

 

web titel : Heavy rains in Maharashtra | Warning heavy rains in Maharashtrath for October month – Panjab dakh