Kohinoor flour mill | ८ लाख १६ हजार रुपये किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त

बनावट आटा चक्की विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बनावट आटा चक्की ( Fake Kohinoor flour mill ) विक्री करण्याचे एक प्रकरण अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole )तालुक्यातून समोर आले आहे. या प्रकरणात कोहिनूर कंपनीच्या ( Kohinoor flour mill ) नावाने बनावट आटा चक्क्यांची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.अकोले येथील 'शेतकरी मशिनरी' दुकानावर (Shetkari Machinery Akole ) नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) छापा टाकून ८ लाख १६ हजार रुपये किमतीच्या ९६ बनावट चक्क्या जप्त करण्याची कारवाई केली आहे. काॅपीराईट कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अकोले येथील शेतकरी मशिनरीचे मालक सुधीर प्रकाश गडाख (वय ३७, रा. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे मालक पराग अशोककुमार शहा (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) (Parag AshokKumar Shah, owner of Vinod Sales Corporation) यांनी दिली आहे. (Kohinoor flour mill )

यापूर्वी दि. ७ जुलैला बनावट आटा चक्की ( Kohinoor flour mill ) सील करण्याची पहिली कारवाई नारायणगाव (वारुळवाडी) येथील 'गडाख मशिनरी' (Gadakh Machinery Narayangaon) यांच्या दुकानावर छापा टाकून करण्यात आली होती. त्यावेळी या दुकानात १४ लाख ९७ हजार किमतीच्या १७५ बनावट आटा चक्क्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (Assistant Inspector of Police Prithviraj Tate of Narayangaon Police Station) यांनी दिली.

 

गडाख मशिनरीचे मालक सुधीर प्रकाश गडाख यांच्यावर पहिला कॉपीराईटचा गुन्हा दाखल झाला होता. तो बनावट माल पोलिसांनी जप्त करून पुढील तपास सुरू केला असता अशाच बनावट आटा चक्कीची विक्री ( Fake Kohinoor flour mill ) अकोले येथील 'शेतकरी मशिनरी' येथे होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ताटे व त्यांच्या पथकाने बुधवारी छापा टाकून ८ लाख १६ हजार रुपयांच्या ९६ बनावट चक्क्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणात आणखी काही घबाड हाती लागते का ? याचा तपास आता वेगाने सुरू आहे. (Kohinoor flour mill )