karjat jamkhed : कर्जत व जामखेड नगरपरिषदेसाठी 8 कोटी 92 लाखांचा निधी मंजूर – आमदार प्रा.राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड (karjat jamkhed) मतदारसंघातील कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे (ram shinde mla) यांनी सरकार दरबारी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. नगरविकास विभागाने जामखेड नगरपरिषदेसाठी 3.05 कोटी तर कर्जत नगरपंचायतसाठी 5.87 कोटी असा एकुण 8.92 कोटींचा भरिव निधी मंजुर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. महायुती सरकारच्या माध्यमांतून त्यांनी करोडोंचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपरिषद कार्यक्षेत्रातील विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याला आता मोठे यश मिळाले आहे. नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून सन 2023-24 लेखाशिर्ष (42170603) अंतर्गत ग्रामविकास विभागाने कर्जत व जामखेड या दोन्ही शहरांसाठी एकुण 8.92 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय 22 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.

Fund of 8 crore 92 lakhs approved for Karjat and Jamkhed Municipal Council - MLA Prof. Ram Shinde, karjat jamkhed news today,

आमदार प्रा.राम राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. सरकारने सभामंडप बांधणे यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय सिमेंट काँक्रिट रस्ते, शाळा खोली, रस्ता खडीकरण मजबुतीकरण, सामाजिक सभागृह तसेच कब्रस्थान अंतर्गत कामे यासाठी एकुण 3.5 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून जामखेड नगरपरिषद कार्यक्षेत्रात 15 कामे मार्गी लागणार आहेत.

shital collection jamkhed

त्याबरोबर कर्जत नगरपंचायत कार्यक्षेत्रात आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून 50 कामे मंजुर करण्यात आली आहेत. यासाठी तब्बल 5.87 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून कर्जत शहरातील अनेक भागातील रस्त्यांची कामे, धार्मिक स्थळांसमोर ,सभामंडप, खडीकरण, गटार बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य, कुस्ती हाॅल, स्मशानभुमी अंतर्गत कामे, ओढ्यावर पुल बांधणे, रस्ता, सभागृह, ओपन जिम, सह आदी कामे केली जाणार आहेत.

कर्जत व जामखेड नगरपरिषद कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कोट्यावधींचा निधी मंजुर झाल्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आमदार प्रा राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

कर्जत व जामखेड या दोन्ही शहरांचा साचेबद्ध विकास व्हावा यासाठी माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो, महायुती सरकारच्या माध्यमांतून दोन्ही शहरांचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी सरकारकडे माझा सदैव पाठपुरावा सुरु आहे. याच पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून जामखेड नगरपरिषदेला 3.5 कोटी तर कर्जत नगरपंचायतला 5. 87 कोटी असा एकुण 8.92 कोटी इतका भरिव निधी मंजुर केला आहे. या निधीतून दोन्ही शहरातील अनेक महत्वाची विकास कामे मार्गी लागणार आहेत. जनतेची मागणी या निमित्ताने पुर्ण होत असल्याचा आनंद आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही शहरांसाठी भरिव निधी मंजुर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !

आमदार प्रा.राम शिंदे