धक्कादायक : जामखेडचे पोलिस उपनिरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात! Police sub-inspector caught in anti-corruption trap

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडले गेले. तीस हजाराच्या लाच प्रकरणात त्यांच्यासह एका खाजगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. हि कारवाई मंगळवारी करण्यात आली. (Police sub-inspector caught in anti-corruption trap)

याबाबत सविस्तर असे की, जामखेड पोलिस स्टेशनला पाॅस्को गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका आरोपीला गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्याबरोबरच त्याला 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांनी आरोपीच्या भावाकडेकडे एक लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

अशी झाली लाचलुपत विभागाची कारवाई (Anti-corruption trap)

जामखेड तालुक्यातील शिऊर येथील 25 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज पाच जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यात पन्नास हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली त्यानंतर 30 हजार रुपयांची तडजोड झाली होती. पोलिस उपनिरिक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांचा प्रत्यक्ष सहभाग समोर आला. संबंधित तक्रारदारास एका हाॅटेलवाल्याकडे लाच देण्यास नाऱ्हेडा यांनी सांगितले होते. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा लावला. जामखेड शहरातील हाॅटेल कृष्णाच्या मालकाला पोलिस उपनिरिक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांच्यासाठी 30 हजार रूपयांची लाच घेताना  रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर पोलिस उपनिरिक्षक सज्जनकुमार  नाऱ्हेडा  यांना जामखेड पोलिस स्टेशनमधून ताब्यात घेण्यात आले.

लाचलुचपत विभागाच्या या धडाकेबाज कारवाईच्या पथकात पोलिस निरीक्षक शाम पवरे, पोलीस हवालदार तनवीर शेख,पोलीस नाईक प्रशांत जाधव पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे  पोलीस कॉन्स्टेबल वैभव पांढरे पोलीस हेडकॉन्स्टेबल हरून शेख यांचा समावेश होता.