गायकवाड,नवलाखा, दळवी,शेख यांना पत्रकारिता पुरस्कार जाहिर!(Journalism awards)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दैनिक लोकमतचे धडाडीचे पत्रकार अनिल गायकवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.(Journalism awards announced for Anil Gaikwad) गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सामाजिक विषयांसह विविध प्रश्नांवर लिखाण करतात.आपल्या आगळ्यावेगळ्या रोखठोक शैलीच्या लिखनामुळे त्यांची बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये वेगळी ओळख आहे.या निवडीमुळे गायकवाड यांंचे अभिनंदन केले जात आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले होते अशाही संकट प्रसंगांमध्ये आपला जीव धोक्यात घालून पत्रकार अनिल गायकवाड यांनी विविध गाव तालुका वाडीवस्तीवर जाऊन जनजागृती आणि आरोग्यविषयक माहिती देण्याचे कार्य केले. त्याचबरोबर ऊसतोड कामगार तसेच कोरोनाकाळामध्ये उघड्यावर अनेकांच्या संसाराचा आवाज लेखनीच्या माध्यमांतुन मांडत अडचणीत सापडलेल्यांचा आवाज शासनदरबारी मांडून त्यांच्या जीवनाला आधार देण्याचे काम पत्रकार अनिल गायकवाड यांनी केले.

दरम्यान पत्रकार अनिल गायकवाड यांनी आजवर पत्रकारितेत दिलेल्या योगदानाची तसेच सामाजिक कार्याची दखल घेत जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

‘या’ पत्रकारांनाही जाहिर झाला पुरस्कार (Journalism awards)

कोठारी प्रतिष्ठानने जाहिर केलेल्या पत्रकारिता पुरस्कारांमध्ये जामखेड तालुक्यातील तीन पत्रकारांचाही समावेश आहे. ( Journalism awards announced for Gaikwad, Navlakha, Dalvi, Shaikh) यामध्ये जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी मिठ्ठूलाल नवलाखा, त्याचबरोबर दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी दैनिक सार्वमतचे तालुका प्रतिनिधी समीर शेख यांचा समावेश आहे. पुरस्कार जाहिर झालेल्या सर्व पत्रकारांचे जामखेड टाईम्स च्या वतीने हार्दिक अभिनंदन !