Agriculture News Today | शेतकऱ्याचा नादच खुळा; रानात नव्हे तर चक्क बंगल्याच्या टेरेसवर फुलवली द्राक्ष बाग

पुणेAgriculture News Today | एकिकडे शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याचे बोलले जाते परंतू शेतीत नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी (Farmer) कमी नाही. शेतीच्या संशोधनातून शेती फुलवणारे अनेक हात आपल्या आसपास असतात. परंतू एका शेतकऱ्याने थेट आपल्या घरावरील टेरेसवर शेती फुलवली आहे. तेही चक्क द्राक्षाची. (Pune, Uruli Kanchan, Bhausaheb Kanchan’s Grapes Garden experiment on house terrace)

द्राक्ष शेतात ( Grapes farming) पिकवली जातात हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु हीच द्राक्ष एखाद्या घराच्या गच्चीवर पिकवली जातात म्हटलं तर कुणाचा विश्वास बसेल का ?  पण असं प्रत्यक्षात घडलय उरळीकांचन गावात. येथील एका शेतकऱ्याने दोन मजली बंगल्याच्या टेरेसवर चक्क द्राक्षाची बाग फुलवली. (Agriculture News Today, Pune, Uruli Kanchan, Bhausaheb Kanchan’s Grapes Garden experiment on house terrace)

उरुळी कांचन परिसरात राहणारे 58 वर्षीय भाऊसाहेब कांचन त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय आहे. उरुळी कांचन परिसरात त्यांची सव्वा तीन एकर शेती आहे. त्यांनी दोन एकरात ऊस, तर दहा गुंठ्यात नारळ, सुपारी, आवळा, जांभूळ, पेरू, आंबा, डाळिंब, चिकू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची त्यांनी लागवड केली आहे.कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी टेरेसवरच द्राक्षाची बाग फुलवली. (Agriculture News Today, Pune, Uruli Kanchan, Bhausaheb Kanchan’s Grapes Garden experiment on house terrace)

भाऊसाहेब कांचन 2013 मध्ये शेतकरी सहलीच्या निमित्ताने युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी युरोपात हजारो एकर वर फुललेली द्राक्ष शेती पाहिजे. अनेक घरासमोर घराच्या टेरेसवर द्राक्षाच्या बागा लगडताना पाहिल्या. हे सर्व युरोपात होऊ शकते तर कृषिप्रधान देश म्हणून ओळख असणार्‍या भारतात हे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर आपणही अशाच प्रकारे द्राक्षाचे उत्पन्न घेऊ अशी खूणगाठ मनाशी बांधूनच ते भारतात परतले.

भाऊसाहेब कांचन यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागेबद्दल सांगितलं, 2015 साली कांचन परिसरात असलेल्या शेतालगत त्यांनी घराचं बांधकाम सुरू केले. बंगल्याचे बांधकाम सुरू असतानाच त्यांनी या बंगल्याच्या भिंतीलगत द्राक्षाचे रोप टाकलं. मांजरीतील द्राक्ष संशोधन संस्थेतून त्यांनी मांजरी मेडिका जातीचं हे रोप आणलं होतं.

हळूहळू ही वेल वाढत गेली. साडेतीन वर्षानंतर ही वेल बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. तोपर्यंत कांचन यांनी या वेलीला अगदी एखाद्या लहान बाळा प्रमाणे सांभाळले. बंगल्याच्या गच्चीवर यावेळी साठी मांडवा सारखा आधार तयार केला. संपूर्ण मांडवभर या वेली पसरल्या होत्या. 2019 पासून या वेलीवर द्राक्षाची घडं दिसू लागली. भाऊसाहेब कांचन यांची गच्ची द्राक्षांचा घडांनी बहरून गेली आहे. (Agriculture News Today, Pune, Uruli Kanchan, Bhausaheb Kanchan’s Grapes Garden experiment on house terrace)

संपूर्ण बाग फुलवण्यासाठी त्यांना सहा हजार रुपयांचा खर्च आला आहे.आता या गच्चीत गेल्यानंतर आपण एखाद्या द्राक्षाच्या बागेत उभे आहोत की काय असाच अनूभव येतो. दरम्यान कांचन यांची अनोखी द्राक्ष बाग परिसरात चर्चेची ठरली आहे. ही बाग पाहण्यासाठी अनेक जण भेट देत आहेत.

भाऊसाहेब कांचन यांच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील सर्वात आधी गच्चीवर जाऊन ही द्राक्षांची बाग दाखवतात. त्यामुळे घरात कधीकाळी पाहुणे आले तर ते सर्वात आधी गच्चीवर जाण्याचा प्रयत्न करतात. ही बाग फुलवण्यासाठी भाऊसाहेब यांच्याबरोबरच त्यांची पत्नी आणि मुलांनी देखील हातभार लावला आहे. कांचन यांची मुलं जेव्हा मित्रांकडे, नातेवाईकांकडे जातात तेव्हा याच बागेतील द्राक्ष भेट म्हणून घेऊन जातात. (Agriculture News Today, Pune, Uruli Kanchan, Bhausaheb Kanchan’s Grapes Garden experiment on house terrace)

संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने फुलवलेल्या या बागेतील द्राक्ष भाऊसाहेब कांचन यांनी कधी विक्रीसाठी काढली नाहीत. ही बाग आणि बागेतील द्राक्ष म्हणजे त्यांच्यासाठी आता जिव्हाळ्याचा विषय झालाय. मित्र-मैत्रिणी नातेवाईक पाहुण्यांना या बागेतील द्राक्ष खायला देतात.स्वतःच्या मनाशी निश्चय करून एखादी असाध्य गोष्ट साध्य करण्याची ठरवलं तर ते सहजरीत्या करू शकतात हेच भाऊसाहेब कांचन यांनी द्राक्षाची बाग उभारून दाखवून दिले आहे.