जामखेड : अल्पवयीन शाळकरी मुलाच्या अपहरणाने जामखेड तालुक्यात उडाली खळबळ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातून एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे.या घटनेने नान्नज सह जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Jamkhed, abduction of a minor school boy created sensation in Jamkhed taluka, incident in Nanda Devi High School area of ​​Nannaj,

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील नंदादेवी हायस्कूल परिसरातून रोहन कल्याण कुमटकर या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेला मुलगा राजेवाडी येथील रहिवासी आहे. तो नान्नज येथील नंदादेवी हायस्कूलमध्ये शिक्षणास होता.

18 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कश्याचे तरी आमिष दाखवून रोहन कुमटकर याचे नंदादेवी हायस्कूल परिसरातून अपहरण केले. ही घटना सकाळी 10: 40 च्या सुमारास घडली असे फिर्यादीत म्हटले आहे.

अपहृत मुलगा रोहन याचे वडील कल्याण कुमटकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नान्नज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोहन याचा जामखेड पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा ,अशी मागणी पालकांनी केली आहे.