पाच लाख रूपये आन नाहीतर नांदू नको; विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी श्रीगोंदा व हळगाव येथील 09 जणांविरोधात गुन्हे दाखल

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी श्रीगोंदा व हळगाव येथील 09 जणांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  सात वर्षांपासून सासरकडील मंडळींकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने सासरकडील मंडळींविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात श्रीगोंदा व हळगाव येथील आरोपींचा समावेश आहे.09 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Crimes filed against 09 persons from Shrigonda and Halgaon for harassing a married woman

सविस्तर असे की,  जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणीचे 07/06/2013 रोजी सतिष महादु लाढाणे रा. बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा, जिल्हा अ.नगर याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर पिडीत तरूणीला सतत त्रास दिला जायचा. सासरी नांदावयाचे असेल तर आम्हाला घर बांधण्यासाठी तिन लाख रूपये घेवून ये यासाठी त्रास दिला जायचा.

सासरकडील 1) नवरा- सतिष महादु लाढाणे 2) दिर- अनिल महादु लाढाणे, 3) सासरे महादु किसन लाढाणे, 4) सासू-हौसाबाई महादु लाढाणे 5) जाव-उषा अनिल लाढाणे 6) चुलत दिर किसनात बाळु लाढाणे 7) पुतणी सोनल अनिल लाढाणे सर्व राहणार बेलवंडी स्टेशन तसेच 8) चुलत चुलती चांगुणाबाई बबन कापसे 9) चुलत चुलते बबन बापु कापसे रा हळगाव ता जामखेड या नऊ जणांनी पिडीतेचा सासरी नांदत असताना सतत छळ केला.

पिडीतेला सतत घालून पाडून बोलून बोलले जायचे. उपाशी ठेवले जायचे. तुला कामधंदा व स्वयंपाक येत नाही. तुला आमच्याकडे सासरी नांदायचे असेल तर तुझ्या माहेरून घर बांधण्यासाठी तिन लाख रूपये व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी दोन लाख रुपये असे पाच लाख रूपये घेवून ये असे म्हणून पिडीतेचा वारंवार शारिरीक व मानसिक छळ छळ करून शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली जायची. तरीपण पिडीता ही  सासरकडील छळ सहन करून कशीबशी नांदत होते.

हळगाव माहेर असलेल्या 25 वर्षीय पिडीत तरूणीला सात वर्षांची मुलगी आहे.

परंतु सासरकडील मंडळींच्या सततच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहित तरुणीने भरोसा सेल कडे 13 जुलै 2021 रोजी तक्रार केली होती. त्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पिडीतेच्या सासरकडील मंडळींचे समुपदेशन करून वाद मिटवला होता. त्यानंतर  पिडीता ही सासरी नांदायला गेली होती.

एक दीड महिने पिडीतेला चांगली वागणूक दिली परंतु पुन्हा तिला सासरकडील मंडळींकडून त्रास देण्यास सुरूवात झाली होती. पिडीतेला मारहाण करून तिच्या अंगावरील दाग दागिणे काढून घेत तिला हाकलून देण्यात आले होते. या प्रकरणात पिडीतेने 01 ऑक्टोबर रोजी सासरकडील मंडळींविरोधात कलम 323, 504,506 प्रमाणे गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पिडीता माहेरी आली.

06 ऑक्टोबर रोजी भरोसा सेलने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे पत्र दिल्यानंतर 07 ऑक्टोबर रोजी  श्रीगोंदा तालुक्यातील सात व जामखेड तालुक्यातील 02 अश्या 09 आरोपींविरुद्ध गु.र.नं- 445 / 2021 भादवी 498 (3) 313 504, 506 (34) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.

या नऊ लोकांविरोधात दाखल करण्यात आले गुन्हे

1) नवरा – सतिष महादु लाढाणे
2) दिर – अनिल महादु लाढाणे.
3) सासरे – महादु किसन लाढाणे
4) सासू-हौसाबाई महादु लाढाणे
5) जाव-उषा अनिल लाढाणे
6) चुलत दिर – किसनात बाळु लाढाणे
7) पुतणी – सोनल अनिल लाढाणे
8) चुलत चुलती- चांगुणाबाई बबन कापसे
9) चुलत चुलते – बबन बापु कापसे