West Indian Sugar Mills Association | वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  खाजगी साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या ‘विस्मा’ (West Indian Sugar Mills Association) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे.

खाजगी साखर उद्योगातील शिखर संघटना असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) (West Indian Sugar Mills Association) या संस्थेची नुकतीच कार्यकारी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक २०२१-२४ या कालावधीसाठी झाली. यात ११ सदस्य बिनविरोध निवडून आले.

अध्यक्षपदी ‘नॅचरल शुगर’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, तर उपाध्यक्षपदी ‘बारामती ॲग्रो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांची निवड करण्यात आली. ही निवड सप्टेंबर २०२४ पर्यंत राहील. (MLA Rohit Pawar elected Vice President of West Indian Sugar Mills Association)

विभागनिहाय सदस्यांची नावे:

दक्षिण महाराष्ट्र

माधवराव घाटगे (अध्यक्ष- गुरुदत्त शुगर्स), योगेश पाटील (कार्यकारी संचालक- अथणी शुगर्स), रोहित नारा (संचालक- सद्‍गुरू श्री साखर कारखाना)

मध्य महाराष्ट्र

पांडुरंग राऊत (अध्यक्ष- श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना), यशवर्धन डहाके (अध्यक्ष- पराग ॲग्रो फूड्स), रणजित मुळे (कार्यकारी संचालक- गंगामाई इंडस्ट्रीज)

मराठवाडा आणि खानदेश

रोहित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी -‘बारामती ॲग्रो’), महेश देशमुख (अध्यक्ष- लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज), बजरंग सोनवणे (अध्यक्ष- येडेश्वरी ॲग्रो)

विदर्भ

बी. बी. ठोंबरे (अध्यक्ष- नॅचरल शुगर), समय बनसोड (संचालक- मानस ॲग्रो इंडस्ट्रीज)

तज्ज्ञ व्यक्ती

हरिभाऊ बागडे (अध्यक्ष- छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग), रवी गुप्ता (अध्यक्ष- रेणुका शुगर्स)

खास निमंत्रित

आमदार संजय शिंदे (अध्यक्ष- विठ्ठल कॉर्पोरेशन)

 

web titel: West Indian Sugar Mills Association  | Rohit Pawar elected Vice President of West Indian Sugar Mills Association