जामखेड पोलिस स्टेशनच्या 10 पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत पदोन्नती 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिस स्टेशनमध्ये विविध पदावर कार्यरत असलेल्या दहा पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत पदोन्नती झाली आहे.शनिवारी दुपारी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड व पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात यांच्या हस्ते पदोन्नती झालेल्या सर्व दहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बॅच लावण्यात आले व सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे अन उत्साहाचे वातावरण होते.

जामखेड पोलिस स्टेशन
जामखेड पोलिस स्टेशनच्या दहा पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत पदोन्नती

 

जामखेड पोलिस स्टेशन

पदोन्नती मिळालेले पोलिस कर्मचारी खालील प्रमाणे

हवालदार ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

१) शिवाजी भोस

पोलिस नाईक ते हेड काँन्स्टेबल

संजय लोखंडे, रमेश फुलमाळी, रावसाहेब नागरगोजे, भगवान पालवे

पोलिस शिपाई ते पोलिस नाईक

अविनाश ढेरे, मुक्तार कुरेशी, अजहरोद्दीन सय्यद, राहुल हिंगसे, बाळासाहेब तागड

शनिवारी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सर्व पदोन्नती प्राप्त पोलिस बांधवांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक फौजदार परमेश्वर गायकवाड, पोलिस नाईक नितीन शेळके, पोलिस नाईक संभाजी शेडे, संग्राम जाधव ,आबासाहेब आवारे, संदिप आजबे, प्रकाश जाधव, संदिप राऊत, दत्तु बेलेकर, सचिन देवळे, विजय सुपेकर, सतिश दळवी, नवनाथ शेकडे, सोनाली देवढे,अनुराधा घोगरे, मनिषा दहिरे सह आदी उपस्थित होते.

जामखेड पोलिस स्टेशन