Tokyo Olympics India | ऑलिम्पिकमध्ये भारताने खाते उघडले; मीराबाई चानूने रचला इतिहास

टोकियो : टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने (Tokyo Olympics India) आज पहिल्या पदकाची कमाई करत खाते उघडले.मीराबाई चानू या भारतीय महिला खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिले रजत पदक पटकाविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

मीराबाई चानु ही २६ वर्षे वयाची महिला खेळाडू आहे. तीने ४९ किलो वजन गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत मीराबाईने प्रथम ८७ किलोचे वजन उचलले व नंतर ११५ किलोचे वजन उंचावून इतिहास रचला. दोन्ही मिळून तिने एकूण २०२ किलोचे वजन उचलले. (Tokyo Olympics India)

चर्चेतल्या बातम्या

चीनच्या होऊ झीहुई हिने या गटात सुवर्णपदक मिळवले तर इंडोनेशियाच्या स्पर्धकाने कांस्यपदक मिळवले आहे. (Tokyo Olympics India)

मीराबाई चानूचा हा ऑलिम्पिक मधला दुसरा प्रयत्न होता.पहिला प्रयत्न तिने २०१६ मध्ये केला होता.२०१६ च्या पहिल्याच प्रयत्नात ती ८२ किलोचे वजन उचलू शकली नव्हती. मात्र दुसऱ्या प्रयत्नात तिने ऐतिहासिक यश साध्य केले. यंदाच्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत मिराबाईने भारताला पहिले पदक मिळवून देत इतिहास रचला आहे. (Tokyo Olympics India)

मिराबाई चानुने पहिले पदक मिळवून देत इतिहास रचल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मिराबाईचे देशातून अभिनंदन केले जात आहे.(Tokyo Olympics India)