- Advertisement -

जामखेड पोलिसांनी लावला गहाळ मोबाईलचा छडा

सायबर सेलच्या मदतीने लागला तपास

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहर व परिसरात मोबाईल चोरीच्या किंवा गहाळ होण्याच्या घटना सातत्याने घडतात. मोबाईल गहाळ किंवा चोरी झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली जाते खरी पण मोबाईल सापडेलच याची खात्री नसते. परंतू पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील टिमने गहाळ मोबाईल हस्तगत करण्यासाठी विशेष तपास मोहीम कार्यान्वित केली आहे. यात आता जामखेड पोलिसांना यश येताना दिसत आहे. Jamkhed police find missing mobile phone

जामखेड तालुक्यातील भुतवडा येथील बाजीराव डोके यांचा अठरा हजार रूपये किमतीचा मोबाईल 20 जानेवारी 2021 रोजी जामखेड शहरात गहाळ झाला होता. तसा गुन्हा जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. जामखेड पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने केलेल्या तांत्रिक तपासात डोके यांचा मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.Jamkhed police find missing mobile phone

डोके यांना त्यांचा मोबाईल जामखेड पोलिसांनी परत केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोस, पोलिस काँस्टेबल मुक्तार कुरेशी,राहुल हिंगसे, व सायबर सेलचे पोलिस काँस्टेबल राठोड यांच्या टीमने पार पाडली आहे