AIMIM MP Imtiaz Jalil : कोरोना नियम धाब्यावर बसवत खासदारांवर पैश्यांची उधळण
वायरल व्हिडीओने महाराष्ट्राचे राजकारण तापले
मुंबई: खुलताबाद परिसरातील एका सार्वजनिक कार्यक्रमामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने जलील यांच्यावर चौफेर टिका होऊ लागली आहे. (AIMIM MP Imtiaz Jalil has once again come under discussion in the state)
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करणारे AIMIM चे खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद प्रशासनाच्या कुठल्या निर्णयाला विरोध केला नाही तर थेट कोरोना नियमावलीलाच हरताळ फासल्याचं समोर आलं आहे. (AIMIM MP Imtiaz Jalil has once again come under discussion in the state)औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या खुलताबाद परिसरात पार पडलेल्या एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जलील यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळणही करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडीओतून समोर आले आहे. या प्रकारानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच फार्म हाऊसही सील करण्यात आलं आहे. (Imtiaz Jalil’s video goes viral, crime against Qawwali organizer, farm house sealed)
खुलताबादमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करुन कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई केलीय. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी संबंधित फार्म हाऊस सील करण्याची कारवाई केली आहे. (AIMIM MP Imtiaz Jalil has once again come under discussion in the state)
इम्तियाज जलील यांचा कव्वालीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आल्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Former Aurangabad MP and Shiv Sena leader Chandrakant Khaire has now become aggressive. He has issued a statement to the Commissioner of Police demanding action against AIMIM MP Imtiaz Jalil )
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असं असताना खुलताबाद परिसरात कव्वालीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कव्वालीच्या या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलीलही सहभागी झाले. त्याचबरोबर जलील जेव्हा व्यासपीठावर गेले तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नोटांची उधळणही करण्यात येत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. इम्तियाज जलील यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.(AIMIM MP Imtiaz Jalil has once again come under discussion in the state)