Jamkhed Wild animal attack : हिंस्र वन्यप्राण्याच्या हल्लात ०४ जण जखमी

वनविभागाचा मलिदा कारभार अन जनतेचा जीव धोक्यात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील रत्नापुर गावात वन्यप्राण्याच्या हल्ल्या चौघे जण जखमी होण्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. (04 injured in wild animal attack) हा हल्ला तरस सदृश्य प्राण्याने केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घालत सर्वांचीच झोप उडवली होती .आता पुन्हा एकदा तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्याने  डोके वर काढले आहे . दरम्यान रत्नापुर मधील हल्ला तरसाने केला की लांडग्याने याची ठोस माहिती वनविभाग देऊ शकलेलं नाही. जामखेड वनविभागाच्या  ‘मलिदा’ कारभाराने जनतेचा जीव मात्र धोक्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथे हिंस्र वन्यप्राण्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाळासाहेब वारे, विमल वारे, भाऊसाहेब वारे, लक्ष्मण वारे हे चौघे जखमी झाले आहेत. सर्वांवर जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जामखेड ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने सर्व जखमींना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.(04 injured in wild animal attack)

रत्नापुर परिसरात आज चार व्यक्तींवर हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला केला आहे.बहुतेक तो लांडगा पिसाळलेला असावा किंवा त्याचे पिल्ले जवळ असावेत किंवा त्याच्यावर कोणीतरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून त्याने प्रतिहल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वनपाल अनिल खराडे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे असे अवाहन वनविभागाने केले आहे.(04 injured in wild animal attack)