जामखेड पोलिस स्टेशनला कोरोना पावला, विक्रमी कारवाया अन विक्रमी दंड वसूली !

सत्तार शेख www.jamkhedtimes.com

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 4 जानेवारी । राज्यात ठाण मांडून बसलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करण्याबरोबर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारांविरोधात जामखेड वाहतूक शाखेने सरत्या वर्षांत केलेल्या कारवायांमुळे सरकारकडे तब्बल 33 लाख 63 हजार 700 रुपयांचा महसुल जमा झाला. ग्रामीण भागात सर्वाधिक महसुल जमा करणारे पोलिस स्टेशन म्हणून जामखेड पोलिस स्टेशन ठरले आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतुक शाखेने मोलाची कामगिरी बजावली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणारांविरोधात मागील वर्षभरात कठोर कारवाया करण्यात आल्या. यातून शासनाला लाखोंचा महसुल मिळाला.

मागील वर्षभरात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कारवाया करणारे पोलिस स्टेशन म्हणुन जामखेड पोलिस स्टेशन ठरले आहे. 12 हजार केसेस वाहतुक शाखेने केल्या आहेत.  मागील चार वर्षांत जामखेड वाहतुक विभागाची आकडेवारी पाहिली असता 2021 या वर्षांत विक्रमी कारवाया करण्यात वाहतुक पोलिसांना यश आले आहे.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. रमेश फुलमाळी पोकॉ. अजिनाथ जाधव, पोकॉ. दिनेश गंगे यांनी वाहतुक विभागाची कामगिरी उंचावली आहे.

सध्या पुन्हा कोरोनाचा उद्रेक राज्यात सुरू आहे. ओमिक्रॉनचाही फैलाव वाढत आहे. सरकारकडून पुन्हा निर्बंध लादले जाऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना नियमांचे उल्लंघन करणारांविरोधात जामखेड वाहतुक पोलिसांच्या टीमकडून जामखेड शहरात धडक कारवाया राबवल्या जाणार आहेत.

2021 मध्ये करण्यात आलेल्या कारवाया खालील प्रमाणे

केसेसचे प्रकार (सन २०२१)एकूण केसेस दंड
विनामास्क केसेस २९२१ १३,९२,५००
सोशल डिस्टन्स केसेस१३७ ८१,८००
कोटपा केसेस
(सार्वजनिक ठिकाणी थुंकणे)
८७० १,७४,०००
डबल सिट केसेस १५१६ ३०,३,२००
मोटार वाहन कायदा केसेस
(विदाऊट नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स, लाऊडस्पीकर, नो पार्किंग, मोबाईल टाॅकिंग, विदाऊट हेल्मेट, सिट बेल्ट, ब्लॅक काच, डेंजर ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट)
५५८११४,१२,२००
एकूण ११०२५ केसेस ३३,६३,७००

मागील चार वर्षांतील कारवाया खालील प्रमाणे

सन एकूण केसेस दंड
२०१८ ११०६ २,४५,८००
२०१९ ७०६ १,५२,४००
२०२० ११८४ २,७४,०००
२०२१ ११०२५ ३३,६३,७००

जामखेड वाहतुक विभागाने 2021 मध्ये केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. नव्या वर्षांतही अशीच कामगिरी होईल. राज्यात कोरोना वाढत आहे. जनतेने स्वता:च्या आरोग्य रक्षणासाठी कोरोना नियमांचे पालन करावे. विनामास्क घराबाहेर पडू नये. विनाकारण गर्दी करून नये. कुणाविरुद्ध कारवाई व्हावी असे आम्हाला वाटत नाही. पण नियम मोडणारांची गय केली जाणार नाही. जामखेडकर जनतेने तालुका कोरोनामुक्त रहावा यासाठी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे.