- Advertisement -

अनाथांची माय | सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन | Social worker Sindhutai Sapkal passes away

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात निधन झालं. 

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्याच्या गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु केली होती. आपल्या सेवाकार्याच्या माध्यमांतून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. अनाथांची माय म्हणून उभा महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. आज तीच अनाथांची माय महाराष्ट्राला पोरकी करून गेली 

सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.