कोल्हापूर : दोन हजाराची लाच स्विकारताना महिला पोलिस काॅन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापूर : Kolhapur Bribery Case : दोन हजार रूपयांची लाच स्विकारताना महिला पोलिस काॅन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Department Kolhapur) रंगेहात पकडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातून गुरूवारी समोर आली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. (Kolhapur bribe news)

Female police constable in bribery net while accepting bribe of 2000, Kolhapur ACB Latest News, Female Police Constable Kajal Ganesh Londhe news

एका 25 वर्षीय पुरूष तक्रारदाराने घरगुती कारणावरून त्याच्या पत्नी विरूद्ध कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्ष (Kolhapur Superintendent of Police Office Women Help Desk) येथे अर्ज दिला होता. सदर अर्ज निकाली काढला व निकाली काढलेल्या अर्जाचे समजपत्र तक्रारदार यांना देणेकामी महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढे (Female Police Constable Kajal Ganesh Londhe) (ब.नं.217) नेमणूक – महिला सहाय्य कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर वर्ग -3, (रा.बंगला नं.10, पार्वती कन्ट्रक्शन, सरनोबतवाडी, पसरीचा नगर ) यांनी तक्रारदार यांच्याकडे 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

महिला सहाय्य कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या महिला काॅन्स्टेबल काजल गणेश लोंढे यांना तक्रारदार पुरुषाकडून दोन हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई 13 जूलै 2023 रोजी करण्यात आली.

ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे (Sardar Nale, Deputy Superintendent of Police, Kolhapur Anti-Corruption Department) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात सपोफो प्रकाश भंडारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील, महिला पोलिस नाईक संगीता गावडे, महिला पोलिस काॅन्स्टेबल पुनम पाटील यांचा समावेश होता. (Kolhapur ACB Latest News)

Trap Case Report
➡ घटक :- कोल्हापूर

➡ तक्रारदार :- पुरुष  25 वर्ष

➡ आरोपी :- 01) काजल गणेश लोंढे, महिला पोलीस कॉन्स्टेबल, ब.नं.217 नेमणूक महिला सहाय्य कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर वर्ग -3, रा.बंगला नं.10, पार्वती कन्ट्रक्शन, सरनोबतवाडी, पसरीचा नगर, ता.करवीर, जि.कोल्हापूर.

➡ लाचेची मागणी  2,000/-रु

▶️ लाच स्वीकारली 2,000/-रु

▶️ सापळा दिनांक :- 13/07/2023

➡ कारण :- तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती कारणावरून त्यांचे पत्नीच्या विरूद्ध महिला सहाय्य कक्ष पो.अ. कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता सदर अर्ज निकाली काढला व निकाली काढलेल्या अर्जाचे समजपत्र तक्रारदार  यांना देणेकामी आरोपी नं.1 यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वीकारल्याने त्याना रंगेहात पकडण्यात आले त्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

▶️ पर्यवेक्षण अधिकारी :- श्री सरदार नाळे, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर. मोबा.9673506555 

▶️ सापळा पथक :- श्री दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक
ला.प्र.वि.सांगली कर्तव्य ला.प्र.वि.कोल्हापूर
सपोफो प्रकाश भंडारे,
पोहेकॉ/840/ अजय चव्हाण
पोहेकॉ /983/ विकास माने
पोना/2061/सचिन पाटील
मपोना/47/ संगीता गावडे
मपोकॉ/2005/पुनम पाटील

➡ मार्गदर्शन अधिकारी :-
1)मा. श्री अमोल तांबे,पोलीस अधीक्षक लाप्रवि,पुणे.
(मोबा.9922100712)   
2) मा. श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी पुणे (मोबा.9921810357)
2)मा.श्री. विजय चौधरी,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे. (मोबा. 9607323232)
▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा.पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.

सरदार नाळे – पोलीस उप अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर. मो.नं. 9673506555.
कार्यालयीन क्रमांक/0231- 2540989)
कोल्हापूर कार्यालय मेल आयडी dyspacbkolapur@gmail.com यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता.
@ टोल फ्रि क्रं. 1064 (आपण दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल.)