जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये कलम 36 व 33 लागू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात पार पडत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश जामखेड तालुक्यातील रत्नापुर, राजुरी आणि शिऊर या तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतही लागू असणार आहे.

Sections 36 and 33 of the Maharashtra Police Act, 1951 apply within the limits of three Gram Panchayats in Jamkhed Taluka.

अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार कॅम्प, नगर तालुका, एमआयडीसी, पारनेर, श्रीगोंदा, बेलवंडी, कर्जत, जामखेड, शेवगांय, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपुर शहर, श्रीरामपुर तालुका, नेवासा, सोनई, शनिशिंगणापुर, पारगांव, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, राजुर, अकोले, राहाता, शिर्डी, लोणी, कोपरगांव शहर, कोपरगाव तालुका, मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत.

अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 व 33 (ओ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक हद्दीत कोणत्याही इसमास गैरशिस्त वागणूक करण्यास मनाई आदेश जारी केला आहे. हे आदेश 20 डिसेंबर, 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास त्या त्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात प्रसंगानुसार आवश्यक ते कोणत्याही नियनांचे आदेशांचे उलंघन होणार नाही अशा रितीने आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.