जामखेड : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जवळ्यात 100 जणांचे रक्तदान

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशाचे नेते पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते अशोक पठाडे यांच्या संकल्पनेतून जवळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 100 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.

Jamkhed, On the occasion of Sharad Pawar's birthday, 100 people donated blood in javala

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर सकाळी 9 ते 3 या वेळेपर्यंत सुरू होते.श्री कमला भवानी ब्लड बँक करमाळा यांच्या सहकार्यातून हे शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात 100 रक्त पिशव्या संकलित झाल्या. हे शिबिर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व समस्त ग्रामस्थ जवळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, माजी सभापती सुभाष आव्हाड, माजी उपसभापती दीपक पाटील, अमित जाधव, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर,माजी सरपंच प्रदीप दळवी, हळगावचे सरपंच सुशेन ढवळे, राहूल पाटील, जीवन रोडे, संजय आव्हाड सह आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य नय्युम शेख, युवा नेते अविनाश पठाडे, संदिप काढणे,सुजित गुळवे, किरण कोल्हे यांनी भरीव सहकार्य केले.