- Advertisement -

या दिवशी निवडले जाणार जामखेड तालुक्यातील 47 गावांचे नवे गावकारभारी! (On this day, new village heads of 47 villages in Jamkhed taluka will be elected)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  जामखेड तालुक्यात नुकत्याच 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर केले आहे. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक कार्यक्रम कधी जाहिर होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या.09 व 10 फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील सरपंचपदाची निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींपैकी 47 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे अशी माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. (On this day, new village heads of 47 villages in Jamkhed taluka will be elected)

जामखेड तालुक्यात 15 जानेवारी रोजी 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. अनेक गावात सत्तांतर झाले. काही गावांमधील सत्ताधारी गटानी सत्ता राखली. काही गावात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. राजकीय घोडेबाजार यामुळे गरम झाला. काठावरचे बहूमत असलेल्या अनेक गावांमधील सदस्य गेल्या पंधरा दिवसांपासून सहलीवर आहेत. सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या अनेकांचा आरक्षण सोडतीने हिरमोड केला तर अनेकांना लाॅटरी लागली. ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी  पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिमने राबवलेल्या उपायोजनांमुळे यंदा तालुक्यात राजकीय वादविवाद उफाळून आला नाही. निवडणुक शांतते पार पडली. आता सरपंचपदाच्या निवडणुकीत कुठलाही राजकीय वाद उफाळून येऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने जंगी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान जामखेड तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक 09 व 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. 09 फेब्रुवारी रोजी कुसडगाव, देवदैठण, सोनेगाव,पाटोदा,तेलंगशी, डोणगाव, पाडळी, चौंडी, धानोरा, अरणगाव, नायगाव, नाहूली, दिघोळ, पोतेवाडी, खर्डा, पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा , कवडगाव, जातेगाव, चोभेवाडी, सातेफळ, झिक्री, वाघा, मोहा  या 24 गावांच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे.

तर 10 फेब्रुवारी रोजी  बाळगव्हाण, मोहरी, राजेवाडी, धोंडपारगाव, घोडेगाव, खुरदैठण, तरडगाव, पिंपरखेड, धामणगाव, नान्नज, गुरेवाडी, आघी, खांडवी, जवळके, आपटी, सारोळा, लोणी, बोरले, आनंदवाडी, जायभायवाडी, बावी, सावरगाव व बांधखडक या 23 ग्रामपंचायतींचे कारभारी निवडले जाणार आहेत. प्रशासनाने ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जय्यत तयारी केली आहे.