- Advertisement -

खर्डा पोलिस स्टेशन : पोलिस अधिक्षकांनी केली प्रस्तावित जागेची पाहणी (Kharda Police Station: Superintendent of Police inspects the proposed site)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे लवकरच नवीन पोलिस स्टेशन कार्यान्वित होणार आहे. या नव्या पोलिस स्टेशनच्या जागेचा प्रश्न आता जवळपास निकाली निघल्यात जमा आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी गुरूवारी प्रस्तावित पोलिस स्टेशन व पोलिस वसाहतीच्या जागेची पाहणी केली. (Kharda Police Station: Superintendent of Police inspects the proposed site)

खर्डा हे शहर मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या भागात स्वतंत्र पोलिस स्टेशन असावे ही या भागातून सातत्याने मागणी होत आहे. खर्डा पोलिस स्टेशनचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत सातत्याने गाजतो. खर्डा पोलिस स्टेशनचा प्रस्ताव शासनाने मंजुर केला आहे. नव्या पोलिस स्टेशन निर्मितीच्या सर्व प्रक्रिया पुर्णत्वास आल्या आहेत. परंतु जागेचा प्रश्न होता. तोही प्रश्न आता सुटल्यात जमा आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पुर्ण होताच गृहविभागाकडून खर्डा पोलिस स्टेशनच्या निर्मितीची घोषणा होऊ शकते. खर्ड्यात स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे यासाठी आमदार रोहीत पवार यांनी जोरदार पाठपुरावा केला आहे.

येत्या अर्थसंकल्पात खर्डा पोलिस स्टेशन संबंधीची महत्वाची घोषणा होऊ शकते .या पार्श्वभूमीवर  गुरूवारी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी खर्ड्यातील प्रस्तावित नव्या पोलिस स्टेशनच्या जागेची पाहणी केली. यावेळी डीवायएसपी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडे, पोलिस नाईक संभाजी शेंडे, गुप्तवार्ता विभागाचे अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल संदिप आजबे, मनोज साखरे, शशि म्हस्के, भगवान पालवे सह  आदी उपस्थित होते. यावेळी खर्डा ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचा सत्कार केला.