जामखेड: जातेगांवच्या सरपंचांविराेधातील अविश्वास ठराव बहूमताने मंजूर‎

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचाविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 15 रोजी बहुमताने मंजूर झाला. यामुळे सरपंच उषा छबुराव गायकवाड यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले. या राजकीय घडामोडीमुळे जातेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

No-confidence motion against Jategaon sarpanch passed by majority, jamkhed latest news,

जामखेड तालुक्यातील जातेगावच्या सरपंच उषाबाई छबुराव गायकवाड यांच्याविरुद्ध‎ सात ग्रामपंचायत सदस्यांनी 8 मार्च 2023 रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत आज 15 मार्च 2023 रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली जातेगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा पार पाडली. या सभेत 7 ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाविरोधात हात उंचावून मतदान करत बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केला. तर एक सदस्य तटस्थ राहिला. सरपंचाला स्वता:चेच एक मत मिळाले.

ग्रामपंचायत कामकाज करताना‎ सरपंच विश्वासात घेत नसल्याचा आरोप‎ करीत सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. आज हा अविश्वास ठराव मंजुर झाल्याने सरपंच गायकवाड यांच्या सरपंचपदावर गंडांतर आले‎ आहे.‎

जातेगांव ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 सदस्य आहेत. जानेवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विद्यमान उपसरपंच रविराज गायकवाड पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वयंभु केदारेश्वर ग्रामविकास पॅनलचे 8 सदस्य निवडून आले होते. यातील उषाबाई छबुराव गायकवाड यांची सरपंचपदावर निवड झाली होती.

सरपंच उषाबाई गायकवाड या विकास‎ कामे व इतर कामकाज करताना‎ ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. सरपंचाचा मुलगा ग्रामपंचायत कामकाजात ढवळाढवळ‎ करतो,शासनाचा निधी वेळेत खर्च‎ होण्यास सरपंचाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ‎ केली जाते म्हणून सरपंच गायकवाड यांच्या‎विरुद्ध सात सदस्यांनी दि. 8 मार्च 2023 रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला‎ होता.

तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांच्या‎ अध्यक्षतेखाली 15 मार्च 2023 रोजी‎ सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यालयात विशेष सभा घेण्यात‎ आली. यावेळी अविश्वास ठराव‎ संबंधी तरतुदी उपस्थित सदस्यांना‎ तहसीलदारांनी समजावून सांगितल्या.‎ अविश्वास ठरावाच्या बाजूने ज्या‎ सदस्यांना मतदान करावयाचे आहे.‎ अशा सदस्यांनी हात वर करावा असे‎ सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रविराज गायकवाड पाटील, सदस्य प्रवीण भीमराव गायकवाड, रुक्मिणी वशिष्ठ गायकवाड, प्रयागा अंगद गायकवाड, आशालता गणेश गायकवाड, दिपाली पांडूरंग गर्जे, दिगंबर लेहना हराळ या सात‎ सदस्यांनी हात वर करीत मतदान केले.‎ तर एक सदस्य तटस्थ राहिला. सरपंचाला स्वता:चे एक मत मिळाले. त्यानुसार सरपंचाविरोधात अविश्वास ठराव 7 विरूध्द 1 अश्या बहुमताने मंजूर झाला.

महाराष्ट्र ग्रामपंचायत‎ अधिनियम अन्वये एकूण ग्रामपंचायत‎ सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश‎पेक्षा जास्त बहुमताने अविश्वास ठराव मंजूर‎ करण्यात आला. तहसीलदार योगेश चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक कैलास जाधव, कामगार तलाठी वास्ते यांनी काम पाहिले खर्डा पोलीस स्टेशनचे मस्के, वारे ,बडे ,यांनी चोख बंदोबस्त बजावला.