राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलचा धुव्वा, धानोरा वंजारवाडीत सत्ताधारी गटाने गड राखला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या धानोरा – वंजारवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने अकरा जागा जिंकत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व संपादन केले. (NCP youth taluka president Sharad Shinde’s panel washed away, ruling party maintains fort at Dhanora Vanjarwadi society election)

धानोरा – वंजारवाडी सेवा सोसायटीची निवडणूक 4 जुुन रोजी पार पडली. तेरा जागेसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली.अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या पॅनलला पराभवाची धूळ चारली आणि सोसायटीची सत्ता कायम राखली.

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी धानोरा वंजारवाडी सेवा संस्थेची निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीतून शरद शिंदे यांच्या राजकीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार होते, परंतु सभासदांनी शिंदे यांचे नेतृत्व नाकारले . या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव शिंदे यांचे तालुक्याच्या राजकारणातील राजकीय वजन घटवणारा ठरला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान धानोरा वंजारवाडी सोसायटीत एकूण 675 सभासद आहेत. त्यापैकी 503 सभासद मतदानास पात्र होते. सोसायटी निवडणुकीमध्ये 503 सभासद मतदारांपैकी 474 मतदारांनी मतदान केले. तर 36 मतदान बाद झाल. या निवडणुकीत श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलने 11 जागांवर दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखली. विरोधी गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागली.

या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून निलेश मुंडे, सचिव महेश शेटे यांनी काम पाहिले.

श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

1) कांतीलाल आण्णा जायभाय : 251
2) सुदाम दत्तु जायभाय 251
3) रमेश गोरख ओमासे 243
4) शहाजी गिराम मिसाळ 237
5) अविनाश संजय पिंपळे 235
6) अंकुश रामा शिंदे 238
7) छबूबाई दिगांबर जायभाय 248
8) सुनंदा अशोक जायभाय 248
09) नवनाथ आप्पा कारंडे 236
10) तुकाराम किसन लोंढे 243
11) हिरालाल कांतीलाल शिंदे 239

चिठ्ठीने तारले आणि विरोधी गटाची एक जागा वाढली

धानोरा वंजारवाडी सोसायटीच्या निकालात एक जागा समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवडण्यात आली. यामध्ये कांतीलाल शिवराम जायभाय व अंजना किसन जायभाय या दोन उमेदवारांना प्रत्येकी 230 मते मिळाली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिठ्ठी टाकून उमेदवार विजयी घोषित करण्याचा निर्णय घेतला. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यात अंजना किसन जायभाय यांचे नशीब फळफळले आणि त्या विजयी झाल्या. त्यामुळे विरोधी गटाची एक जागा वाढली.

विरोधी गटाचे विजयी उमेदवार

1) शरद मधुकर शिंदे 234
2) अंजना किसन जायभाय 230

श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलच्या विजयाचे शिल्पकार

धानोरा – वंजारवाडी सोसायटी निवडणूकीत श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजयात चेअरमन मधुकर जायभाय, माजी मंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब जायभाय, ग्रा प. सदस्य बाळु जायभाय, बबन जायभाय मुकादम, माजी उपसरपंच विठ्ठल ओमासे, कांतीलाल जायभाय, गोकुळ मिसाळ, महादेव (पप्पु) ओमासे, नानासाहेब जायभाय, माजी सरपंच रमेश तुपेरे,माजी उपसरपंच विश्वनाथ जायभाय, विजय जायभाय, अरुण आढाव, भाऊ काळे, माजी उपसरपंच बबन जायभाय, भगवान शिंदे, अर्जुन जायभाय, बाळू सांगळे, राजेंद्र जायभाय, अर्जुन फुंदे, माजी सरपंच रावसाहेब आढाव, विठ्ठल जायभाय, जालिंदर लोंढे, भगवान नामदेव जायभाय, जगन्नाथ तुपेरे, राजेंद्र दराडे, महादेव जायभाय, अमोल जायभाय, राजेंद्र बाबासाहेब जायभाय, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जायभाय, सुरेश टकले, संदिप गिरी, लिंबु व्यापारी संजय जायभाय, शिवाजी जायभाय, रावसाहेब (आण्णा) जायभाय, आजिनाथ जायभाय, हरिदास शिरगिरे, गोकुळ जायभाय, दगडू फुंदे, ज्ञानदेव मिसाळ, उद्योजक भरत शिंदे, मल्हारी जायभाय, गहिनीनाथ जायभाय, अर्जुन जायभाय, विकास जायभाय, गोकुळ जायभाय पाटील, रवींद्र गोपाळघरे, बाप्पू भिसे,गहिनीनाथ दराडे, दादा गोल्हार, रामा फुंदे, नवनाथ महादू जायभाय,विठ्ठल जायभाय सह श्री आणखेरीदेवी सर्वसामान्य शेतकरी विकास पॅनलचे मतदार विजयाचे शिल्पकार ठरले.

पहा विजयाचा जल्लोष