जामखेड : महाविकास आघाडीने गेली तीन वर्षे राज्यातील जनतेला जलजीवन योजनेपासून वंचित ठेवले – आमदार प्रा.राम शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । हर घर जल ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना देशभरात हाती घेतली आहे. परंतू ही योजना आपल्याकडे सुरू व्हायला उशीर झाला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव होईल म्हणून महाविकास आघाडी सरकारने गेली तीन वर्षे राज्यातील जनतेला या योजनेपासून वंचित ठेवलं, सरकार असताना कामं थांबविण्याचं षडयंत्र, पाण्यापासून वंचित ठेवण्यात पाप महाविकास आघाडी सरकारने केलं, पण आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर जलजीवन मिशन योजना राज्यात मोठ्या गतीने राबवली जात आहे, पण इथले विरोधक मात्र गावागावात जाऊन योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.

Mahavikas Aghadi has deprived people of state from Jaljeevan Yojana for the last three years - MLA Prof. Ram Shinde's strong attack, ram shinde news

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिंपरखेड – हसनाबाद गावासाठी 1 कोटी 26 लाख रूपये खर्चाच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला. माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते सदर योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार राम शिंदे बोलत होते.

Mahavikas Aghadi has deprived people of state from Jaljeevan Yojana for the last three years - MLA Prof. Ram Shinde's strong attack, ram shinde news

यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील,  गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, रविंद्र सुरवसे, सोमनाथ पाचरणे, लहू शिंदे, सरपंच राजेंद्र ओमासे, माजी सरपंच बापूराव ढवळे, उपसरपंच अविनाश गायकवाड,  ग्रामपंचायत सदस्य बाळू कारंडे, सुर्यकांत कदम, इसाक सय्यद,  नवनाथ ओमासे, अंबर लबडे, ग्रामसेविका निलिमा कुबसंगे, दत्तात्रय आधुरे , पृथ्वीराज भोसले, भारत पाटील, भगवान ओमासे, मकबूल शेख, शिवाजी कारंडे, राहूल चोरगे, बापू शिंदे सह आदी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांचे भाषण झाले.

Mahavikas Aghadi has deprived people of state from Jaljeevan Yojana for the last three years - MLA Prof. Ram Shinde's strong attack, ram shinde news

त्यामुळं काळजी करायचं कारण नाही…

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन बीलं भरल्याशिवाय डिप्या देत नव्हते, पण आता आपल्या सरकारच्या काळात डिप्या लगेच मिळतात, पण शेतकऱ्यांनी थोडे फार बीलं भरावीत, मागचं सरकार अतिशय क्रुरतेने वागलं, भरणं आलं रे आलं की डिप्या बंद केल्या जायच्या, हे लक्षात ठेवा असे सांगत शिंदे पुढे म्हणाले की, आता परिस्थिती बदललीय, मी आमदार झालोय, सरकार आपलं आलयं, राधाकृष्ण विखे-पाटील महसूल मंत्री आणि पालकमंत्री झालेत, त्यामुळं काळजी करायचं कारण नाही.

माझं आणि सुजय विखेंचं एखाद काम नाही ऐकलं तरी चालेल पण…

गेल्या अडीच तीन वर्षांत केंद्राचा निधी असला तरी पठ्ठे नुसतं दंड थोपटू थोपटू म्हणायचे आम्हीच आणलाय,सगळे अधिकारी आज जे आपल्याबरोबर फिरत्येत ते त्यांच्याबरोबर फिरायचे, आता ते बी आता डबल भाषण ऐकतेत, तिकाडचं ऐकत्येत, इकडचं ऐकत्येत, आता त्यांना खरं पटलयं, नेमकं कामं कोण करतयं, आपल्या काळात अधिकारी जनतेचे सेवक म्हणून काम करतील, कोणाचं सेवक म्हणून काम करणार नाहीत, माझं आणि सुजय विखेंचं एखाद काम नाही ऐकलं तरी चालेल पण सर्वसामान्य माणसाचं कामं ऐकलं नाही तर गाठ आमच्याशी आहे, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला.

जामखेड ते राशिन हा 250 कोटी रूपयांचा नवा रस्ता

दरम्यान आमदार राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, जामखेड ते राशिन हा 250 कोटी रूपयांचा नवा रस्ता मी सुचवला आहे.  हा रस्ता जामखेड- आयटीआय- कुसडगाव – फक्राबाद- पिंपरखेड- चोंडी – चापडगांव- लोणी मसदपुर-खातगाव – आंबीजळगाव- निंबे- आळसुंदा – राशिन असा असणार आहे. हा रस्ता फक्राबादहून पिंपरखेड ला पण तेथून चोंडीकडे कसा निघेल हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. येत्या बजेटमध्ये हा रस्ता मंजुर होणार असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.

जेव्हा केव्हा करायचं ते मीच करू शकतो…

कुकडीचे पाणी यायचयं म्हणून लोकं वर बघत्येत सकाळ दुपार, संध्याकाळ, पण कुकडीचे पाणी येणार का? नाही येणार ? हे फक्त राम शिंदेचं ठरवू शकतो, त्यामुळे जेव्हा केव्हा आणायचं, जेव्हा केव्हा करायचं ते मीच करू शकतो, असे सांगत आमदार शिंदे पुढे म्हणाले की, खोटं बोलून एकदा कामं होतं, पण खोटं बोलून दुसर्‍यांदा काम होत नाही, पिंपरखेडमध्ये होत असलेल्या जलजीवन योजनेतून वाड्या वस्त्यांना पाणी मिळालं पाहिजे, योजनेचं काम दर्जेदार झालं पाहिजे, त्यासाठी दक्ष रह, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.