जामखेड: रोहित पवारांविरोधात कर्जत-जामखेडमध्ये उसळली संतापाची लाट, जामखेड भाजपने नोंदवला रोहित पवारांचा तीव्र निषेध

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघात उमटू लागले आहेत. रोहित पवारांविरोधात मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. रोहित पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा कर्जत आणि जामखेड भाजपच्या वतीने आज तीव्र निषेध करण्यात आला. जामखेड भाजपने भरपावसात खर्डा चौक येथे आमदार रोहित पवारांच्या विरोधात निषेध अंदोलन केले.

यावेळी पार पडलेल्या अंदोलनात भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रोहित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “रोहित पवारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, रोहित पवारांचा निषेध असो, आमदार राम शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है” सह आदी घोषणांनी खर्डा चौक परिसर दणाणून गेला होता. या अंदोलनात भाजपा नेत्यांनी आमदार रोहित पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेत जोरदार निषेध नोंदवला.

Jamkhed, wave of anger erupted in Karjat-Jamkhed against Rohit Pawar, Jamkhed BJP registered strong protest against Rohit Pawar, jamkhed news today,

या अंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, भाजपा विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, पंचायत समिती सदस्य भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बाजार समिती संचालक गणेश जगताप, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे,प्रविन सानप, सोमनाथ राळेभात, प्रविन चोरडीया, सुनिल यादव, उदय पवार, महारुद्र महारनवर, अशोक महारनवर,महेश काळे, नाना गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, उध्दव चेअरमन, दादा महारनवर, नितीन बुचुडे, दिनकर टापरे,अंगद गव्हाने, राम पवार (बावी), सादु मडके, सदाशिव कवादे, मोहनमामा गडदे, राहुल राऊत, डाॅ खोत, बाळु गोपाळघरे,प्रविन बोलभट, आण्णासाहेब ढवळे, मोहन देवकाते,विष्णु गंभीरे, बाबासाहेब फुलमाळी, तुषार बोथरा,बिट्टु मोरे, अजून मेहत्रे सह आदी भाजपा कार्यकर्ते या अंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी झालेल्या अंदोलनात जामखेड भाजपच्या नेत्यांनी आमदार रोहित पवारांवर तुफान टीका केली, पहा खालील व्हिडीओ