जामखेड तालुक्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतीमधुन ‘इतक्या’ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज!

ऐन गुलाबी थंडीच्या कडाक्यात जामखेड तालुक्यातील 49 गावांमधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापु लागले आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रारंभ झालेला आहे. गावागावातील पॅनल प्रमुख उमेदवार फायनल करण्यात मग्न झाले आहेत. रूसवा फुगवा दुर करताना पॅनल प्रमुखांची दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात यंदा भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा थेट सामना रंगताना दिसणार आहे. आमदार रोहित पवार व माजी आमदार प्रा राम शिंदे यांच्या गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागणार आहेत.

दरम्यान उमेदवार अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसर्या दिवशी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीमधुन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नान्नज 02, खर्डा 01, दिघोळ 03, पाटोदा 02,  पिंपरखेड 02 असे एकुण 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे.