अशी आहे जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय मतदान आकडेवारी ! (Gram Panchayat wise polling statistics of Jamkhed taluka)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात आज 15 जानेवारी रोजी 39 ग्रामपंचायतीसाठीचे मतदान किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमधील एकुण 67 हजार 368 मतदारांपैकी 55 हजारपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार जामखेड तालुक्यात एकुण 82.48 % मतदान झाले आहे. जामखेड तालुक्यात सर्वाधिक 92.80% मतदान बोर्ले ग्रामपंचायतीत झाले तर सर्वात कमी 67.24% मतदान खर्डा ग्रामपंचायत झाले. जामखेड तालुक्यामध्ये आज पार पडलेल्या 39 ग्रामपंचायतींच्या 299 जागांसाठी 714 उमेदवार रिंगणात होते अशी माहिती जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी रात्री दहा वाजता माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीचे गावनिहाय झालेले मतदान व टक्केवारी खालीलप्रमाणे आहे. (Gram Panchayat wise polling statistics of Jamkhed taluka)