पाटोद्यात शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही वाढदिवस पाटोद्यात साजरा करण्यात आला आहे.

Distribution of food to school students in Patoda

महाराष्ट्राच्या मातीने घडवलेल्या पवार आणि मुंडे या दोन लोकनेत्यांच्या विचाराचा जागर नव्या पिढीला व्हावा यासाठी 12 डिसेंबर रोजी राज्यभरात वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने आज पाटोद्यातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच समीर पठाण, बाप्पु मोरे कल्याण कवादे पाटील, विष्णु भवर, गौतम मोरे जगन्नाथ मोरे, प्रकाश कडु, बाबासाहेब माने भाऊसाहेब कवादे,नाना गव्हाणे,बाळु शिंदे, सुखदेव शिकारे, अन्सार पठाण, बांगर सर, राठोड मॅडम, हजारे मॅडम, जोगदंड मॅडम सह ग्रामस्थ उपस्थित होते.