हळगाव येथील हाजी महेबुबभाई शेख यांचे निधन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील मुस्लिम समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा तब्लीग जमातचे प्रमुख हाजी महेबुब रसुल शेख यांचे आज 20 मार्च 2021 रोजी दुपारी हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. हाजी महेबुबभाई अतिशय धार्मिक स्वभावाचे होते. त्यांनी दोनदा हजयात्रा केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. पैलवान शकील शेख यांचे ते आजोबा होते.

आज शनिवारी रात्री 8:30 वाजता हळगाव येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे अशी माहिती पै शकील शेख यांनी दिली.