जामखेड पोलिसांच्या चाणाक्षपणाने फुटले महिलेचे बिंग! (Jamkhed police cleverly broke the woman’s bing)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) खोट्या गुन्ह्यात अडकवून आपले मनसुबे साध्य करणारे समाजात ढिगाने आहेत. अश्याच खोट्या गुन्ह्यांमुळे अनेकांच्या आयुष्याचे मात्रे झाल्याचेही अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु पोलिस अधिकारी व कर्मचारी जेव्हा सोशल पोलिसिंग करू लागतात तेव्हा भल्या भल्यांचा बाजार मात्र उठतो. असाच काहीसा प्रकार जामखेड पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणला आहे. अपहरणाची खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी अपहरणाची खोटी फिर्याद दाखल केल्याच्या कारणावरून एका महिलेविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. (Jamkhed police cleverly broke the woman’s bing)
याबाबत सविस्तर असे की, जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 80/2021 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शोभा सवई राठोड (रा. धनगरवाडी, ता. दारव्हा, जिल्हा यवतमाळ) या 55 वर्षीय महिलेने आपला मुलगा प्रेम राठोड याचे जामखेड तालुक्यातील मोहा येथून अपहरण झाले असल्याची फिर्याद दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीपाल भारत वसेकर (रा. टाकळी सिकंदर ता. मोहळ जिल्हा सोलापूर ) व मुलगा प्रेम राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेऊन जामखेड पोलिस स्टेशनला आणले व यावेळी चौकशी केली असता चौकशीत वेगळीच धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.
