संकट कोरोनाचे : जिल्हाधिकारी आज दुपारी जामखेड तालुका दौऱ्यावर! (Collector to visit Jamkhed taluka this afternoon)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी व जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज जामखेड तालुका दौऱ्यावर येणार आहेत. जामखेड तहसिल कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठक पार पडणार आहे. (Collector to visit Jamkhed taluka this afternoon)
जामखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील दिघोळमध्ये सर्वाधिक कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. दिघोळ गाव प्रशासनाने 15 दिवसांसाठी लाॅकडाऊन केले आहे. तसेच पाडळीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. सध्या प्रशासनाने रॅपिड अँटीजेन चाचण्या व RTPCR चाचण्या वाढवल्या आहेत. तालुक्यातील कोरोना बाधिताची संख्या 150 च्या पार जाऊन पोहचली आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट सक्रीय झाल्याचे संकेत मिळत असतानाही उपाययोजना मात्र होताना दिसत नाही. नागरिक अजूनही बेफिकीर आहेत. मागील वर्षी कोरोनाचा सर्वाधिक फटका जामखेड शहराला बसला होता. यातून जामखेडकर जनता काहीही शिकलेली नाही असेच वारंवार दिसत आहे. शहरात विनामास्क फिरत असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. नगरपरिषदेची कारवाई शुन्य आहे. नगरपरिषद कठोर कारवाईची मोहिम राबवताना दिसत नाही. (Collector to visit Jamkhed taluka this afternoon)
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज दुपारी 03:30 वाजता जामखेड तालुका दौऱ्यावर येणार असुन कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांचा आढावा घेणार आहेत. जामखेड तहसिल कार्यालयात यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ( Collector to visit Jamkhed taluka this afternoon)