जिल्हा बँकेच्या निवडणूकी संदर्भात राम शिंदेंनी केली ही महत्वाची घोषणा! (Ram Shinde important announcement regarding the District Bank elections)

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी माजी मंत्री राम शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मी जिल्हा बँकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा राम शिंदे यांनी केली आहे.(Ram Shinde important announcement regarding the District Bank elections) या घोषणेमुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गेल्या आठवडाभरापासून शिंदे समर्थकांमध्ये राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या मैदानात उतरणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला आज राम शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. (important announcement made by Ram Shinde regarding the District Bank elections)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या समवेत काल रात्री माजी मंत्री राम शिंदे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांची बैठक झाली.या बैठकीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनल बनवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील व शिवाजी कर्डिले या तिघांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांवर पक्षाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे अशी माहिती राम शिंदे यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.