माजी मंत्री राम शिंदेंनी डागली आमदार रोहित पवारांवर तोफ म्हणाले… (Former Minister Ram Shinde fired a cannon at MLA Rohit Pawar)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा दारूण पराभव होऊ शकतो हे ओळखूनच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आला हा निर्णय म्हणजेच आमदार रोहित पवारांचा नैतिकदृष्ट्या पराभवच आहे अशी तोफ माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमांतुन आमदार रोहित पवारांवर डागत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे. (Former Minister Ram Shinde fired a cannon at MLA Rohit Pawar)

Rohit Pawar, Ram shinde

माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी फेसबुकवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते तर राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता. ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज बाद झाला असताना आ. रोहीत पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. निवडणूक झाली तर दारून पराभव होईल या भीतीने आ. रोहीत पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज माघे घेतला हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरवात झाली आहे. (Former Minister Ram Shinde fired a cannon at MLA Rohit Pawar)

माजी मंत्री राम शिंदे यांनी पुन्हा एकदा रोहीत पवारांना लक्ष्य करत केलेल्या टिकेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राम शिंदे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी “आता सुरूवात झाली आहे” हे वाक्य लिहीत हा बाण नेमका कुणावर सोडलाय याचीच चर्चा आता जोरदारपणे रंगु लागली आहे. (Former Minister Ram Shinde fired a cannon at MLA Rohit Pawar)