OBC Bahujan Party : मोठी घोषणा – महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसींच्या नव्या राजकीय पक्षाचा उदय, पक्षाचं नाव, झेंडा आणि चिन्हही ठरलं !

Prakash Shendage announced OBC Bahujan Party  : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे अंदोलन तीव्र बनत चालले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण त्यांचा ओबीसीत समावेश करू नये यासाठी राज्यातील ओबीसी बांधवही आक्रमक झाले आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरूध्द ओबीसी हा संघर्ष तापला आहे.ओबीसी समाजाकडून राज्यात ठिकठिकाणी सभा घेऊन एकजूट दाखवली जात आहे. अश्यातच ओबीसी नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. (OBC Bahujan Party)

OBC leader Prakash Shendage announced OBC Bahujan Party, Big announcement, emergence of new political party of OBCs in Maharashtra politics, OBC Bahujan Party  became flag and symbol too decided

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी ओबीसी बहुजन पार्टीची (OBC Bahujan Party) घोषणा केली आहे. या नव्या पक्षाच्या माध्यमांतून ओबीसींची एकजूट दाखवण्याचा त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी नव्या पक्षाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. त्यांनी आपल्या नव्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचा झेंडा याबाबत माहिती जारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. अनेक मोठे नेते पक्षांतर करत आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. जरांगे यांची तब्येत बिघडली. त्यांच्या नाकातून रक्त स्त्राव झालाय. महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी बंद पाळत जरांगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय. तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी नव्या राजकीय पक्षाची (OBC Bahujan Party) घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा वादळ सध्या महाराष्ट्रावर घोंघावत आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलंय. सत्तेचा वापर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला घालण्यासाठी करण्यात आला. महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्याचे राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं आहे. त्यामुळे नवा पक्ष (OBC Bahujan Party) स्थापन करण्यात आलाय, असं शेंडगे म्हणाले.

भटक्या विमुक्त यांना न्याय देणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट्य असेल. तिकिटासाठी ज्यांना खेपा घालाव्या लागत होत्या त्यांना आता खेपा घालाव्या लागणार नाहीत. 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदार संघात ओबीसी, भटके, विमुक्त उमेदवार देण्यात येतील, असं ते म्हणाले.

शेंडगे यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी देखील भाष्य केलं. हा पक्ष स्थापन करत असताना आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. जेव्हा केव्हा ते बाहेर पडतील तेव्हा तेच आमचे नेते असतील हे निश्चित आहे. आज सत्तेत ओबीसीच्या बाजूने लढणारे ते एकमेव नेते आहेत. जोवर सरकार आहे तोवर सरकार मध्ये राहून त्यांनी संघर्ष करावा आणि आपली बाजू मांडावी, असं ते म्हणाले. (Latest Marathi News) (OBC Bahujan Party)

ओबीसींच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव काय ?

ओबीसींच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव ओबीसी बहुजन पार्टी– OBC Bahujan Party हे आहे. ओबीसी बहुजन पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना 14 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत करण्यात आली. हा पक्ष ओबीसी, भटके, विमुक्त समाजाच्या न्याय हक्कांसाठी तसेच आरक्षणाचे रक्षण स्थापन करण्यात आहे.

ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची कोणी स्थापना केली ?

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी बहुजन पार्टी (OBC Bahujan Party) या नव्या राजकीय पक्षाची घोषणा 14 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे. या पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे असेल तर पक्षाचा झेंडा ‘पिवळ्या’ रंगाचा असणार आहे, अशी घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली.