Ramraje Nimbalkar: माढ्याच्या वादावर तोडगा नव्हे तर पुन्हा नवा ट्विस्ट, रामराजे निंबाळकर म्हणतात… कार्यकर्त्यांनो अफवांवर विश्वास ठेऊ नका
Madha Lok Sabha Matdar Sangh : माढा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti) वाढलेली धुसफुस शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (BJP NCP) यांनी बैठक बोलावली.नेत्यांशी चर्चा केली.बैठकीत तोडगा निघाल्याचे वृत्त (news) समोर आले.पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट (twist) आला आहे.राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे अवाहन कार्यकर्त्यांना केल्याने माढ्याचा तिढा अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.रामराजे निंबाळकर यांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय? याचीच उत्सुकता माढा लोकसभा मतदारसंघात शिगेला पोहोचली आहे. (Ramraje Nimbalkar latest news today)
माढा लोकसभा (Lok Sabha election 2024) मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेगळी भूमिका घेत विरोध केला आहे. रामराजेंची समजुत काढण्यासाठी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही. महायुतीचा धर्म पाळावा, या फडणवीसांच्या सुचनेला रामराजेंनी विरोध करत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेईन, असे सांगितले. त्यामुळे माढ्याचा तिढा बैठकीनंतरही कायम राहिला आहे.(Madha latest news today)
माढा मतदारसंघाबाबत (Madha Constituency) महायुतीत निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आज फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला फडणवीसांसह अजित पवार (Ajit Pawar), रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगरसेवक अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते.
सध्या माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंंह नाईक निंबाळकर (Ranjisingh Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारीवरुन पेच निर्माण झाला आहे. भाजपने जरी उमेदवारी जाहीर केली असली तरी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी या उमेदवारीला विरोध केला आहे. तसेच ही उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठींबा मिळविण्यास सुरवात केली होती.
यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माढा मतदारसंघात महायुतीतच वाद पेटला होता. यावर तोडगा काढण्यासाठी संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करुन सर्वसमावेशक तोडगा काढला. पण, रामराजे नाईक निंबाळकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले होते. त्यामुळे हा वाद शमविण्यासाठी आज महायुतीतील नेत्यांची बैठक झाली.
बैठकीत देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी रामराजेंना महायुतीचा धर्म पाळावा, अशी सूचना केली. त्यावर रामराजेंनी मी याबाबत माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेईन, असे सांगितले. यावरुन माढा मतदारसंघातील तिढा सुटला, अशी अफवा काहींनी पसरवली होती. त्यावर रामराजेंनी व्हॉटस॒अप स्टेटस॒च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे म्हटले आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामा ने दिले आहे.