Chhagan Bhujbal speech Sharad Pawar birthday | महाराष्ट्रात घडलेला चमत्कार 2024 मध्ये दिल्लीत होणार; छगन भुजबळ यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

मुंबई  : Chhagan Bhujbal speech Sharad Pawar birthday | संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar) यांच्यात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aaghadi Government) चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल असा दावा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त (Sharad Pawar Birthday) आयोजित विशेष कार्यक्रमात अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यांसह विविध महत्त्वाच्या क्षेत्रात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेले काम जगभरात गाजले असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे कामही त्यांनी केले. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून, फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे जगभरात अन्न, धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे छगन भुजबळ सांगितले.

अनेक संकटांना शरद पवारांनी तोंड दिले आहे. किती जरी मोठे संकट त्यांच्यासमोर आले तरीदेखील शरद पवारांचा संयम कधीही ढळणार नाही, ही अतिशय विशेष बाब आहे. देशभरात जो ओबीसींचा प्रश्न गाजत आहे. त्या ओबीसी समाजाला सर्व प्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. राज्यात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासोबत अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर पोहोचला असे छगन भुजबळ यांनी नमूद केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल, त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. भुजबळ यांनी केलेल्या दाव्यावर राजकीय वर्तुळाच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत.

Chhagan Bhujbal speech Sharad Pawar birthday, miracle that happened in Maharashtra will happen in Delhi in 2024, Chhagan Bhujbal claim raised eyebrows in political circles,