अखेर कर्जत भाजपचा गड ढासळला : नामदेव राऊतांनी केला राष्ट्रवादीत जाहीर  प्रवेश  !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून कर्जत भाजपमधील एक मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी रंगलेली चर्चा अखेर गुरूवारी खरी ठरली.

कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष भाजपा नेेेेते नामदेव देवा राऊत यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत आज पार पडला.यावेळी आमदार रोहित पवार उपस्थितीत होते.

बातमी अपडेट होत आहे…

 

big news bjp leader namdev raut joins ncp today
big news – bjp leader namdev raut joins ncp today

भाजपा नेते नामदेव राऊत यांच्यासह नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, उषा अक्षय राऊत, किरण पाटील, सतीश समुद्र, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, किरण पाटील आणि रवी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांच्य् उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यांच्यासह अमृत काळदाते, भाजपाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, बाजार समितीचे संचालक बजरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते इन्नूस पठाण, दीपक ननवरे, अरबाज पठाण, साहिल कुरेशी अलिम कुरेशी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

कोणत्याही अपेक्षेशिवाय लोकहितासाठी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या या नेत्यांचं स्वागत करुन मा. अजितदादांनी त्यांच्याशी संवादही साधला. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी दाखवलेला विश्वास पुढील काळात सार्थ ठरवला जाईल. त्यांच्या प्रवेशामुळं पक्षाची कर्जतमधील ताकद वाढण्यासही निश्चितच मदत होणार आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, सुभाष गुळवे, नितीन धांडे, प्रसाद ढोकरीकर, बापूसाहेब नेटके, भास्कर भैलुमे, अभय बोरा, रज्जाकभाई झारेकरी, दीपक शिंदे, लालासाहेब शेळके आणि नितिन तोरडमल आदी स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

big news bjp leader namdev raut joins ncp today