Dombivli gang rape case | Shocking | महाराष्ट्र पुन्हा हादरला : अल्पवयीन मुलीवर आठ महिने बलात्कार, 29 जणांविरोधात गुन्हे दाखल !

मुंबई : Dombivli gang rape case |  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या बलात्काराच्या घटना चिंतेच्या विषय बनू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे आणि साकीनाका येथील घटनांनी महाराष्ट्र हादरला होता.आता डोंबिवलीमधून सामुहीक बलात्काराची भयानक घटना समोर आली.या घटनेत अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. (15-year-old girl was gang-raped by 29 persons for eight months)

डोंबवलीमध्ये एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल 29 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (Dombivli gang rape case)

या प्रकरणात 21 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे यांनी दिली. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. उर्वरित सहा आरोपींचा पोलीस शोध घेत असलयाचे कराळे यांनी सांगितले.

मुख्य आरोपी हा पीडितेचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. ज्याने जानेवारीमध्ये मुलीवर प्रथम बलात्कार केला होता आणि तिचा व्हिडिओही बनवला होता.नंतर, इतर आरोपींनी त्याच व्हिडिओचा वापर करून मुलीला ब्लॅकमेल केले आणि डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाडसह विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

याबाबत पीडितेने बुधवारी रात्री पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलींचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

डोंबिवली येथे(Dombivali) १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना(Gang Rape In Dombivali) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station)२९ जणांविरोधात गुन्हा दाखल (Crime In Dombivali)करण्यात आला आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेतलं आहे . या प्रकरणातील आरोपीमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात तिच्यावर ८ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली.या चौकशीमध्ये जे समोर आलं ते ऐकून पोलीस हैराण झाले.जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकराणे बलात्कार करत तिचा व्हिडिओ काढला .हा व्हिडिओ या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडिओच्या आधारे आतापर्यंत २९ जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर,रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांना ताब्यात घेतलं आहे त्यामधील दोन अल्पवयीन आहेत .या प्रकरणात २१ आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.