spain la palma volcano eruption | स्पेनमधील ज्वालामुखीचा उद्रेक, शहराला लाव्हारसाचा वेढा : पहा थरकाप उडवणारे दृश्य !

स्पेन : spain la palma volcano eruption letest news | स्पेनच्या कॅनरी आयलँडवरील ला पाल्मा ज्वालामुखीचा 50 वर्षानंतर पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे. यामुळे हजारो फूट उंच लाव्हा फेकला जात असून लाव्हारसाने जवळील एल-पासो (El Paso) शहराला तिन्ही बाजूने वेढा घातला आहे.

सध्या या भागातील व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. ज्वालामुखीतून निघणाऱ्या लाव्हारसाची थरकाप उडवणारे दृश्य या व्हिडीओत आणि फोटोंमध्ये दिसत आहेत. (The La Palma volcano on Spain’s Canary Islands has erupted again after 50 years.)

लाव्हारसामुळे आतापर्यंत 166 घरांची माती झाली असून रस्त्यावर लाव्हारसाची भिंत तयार झाली आहे. आणखी काही दिवस ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडेल असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे, मात्र तोपर्यंत शहरात हाहाकार उडालेला असेल.

spain la palma volcano eruption
Image credit – twitter

पाल्मा ज्वालामुखीला ला कंब्रे व्हियेजा ( La Cambre Vieja) अर्थात द ओल्ड समिट (The Old Summit) असेही म्हटले जाते.

याआधी 1971 मध्ये ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. आता 19 सप्टेंबर 2021 पासून ज्वालामुखीचा विस्फोट होत असून एल-पासो शहरातील अनेक घरं जळून राख झाले आहेत. तसेच शेती आणि लोखंडी पूल यांचेही नुकसान झाले आहे.

spain la palma volcano eruption letest news

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आतापर्यंत शहरातील 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आणखी चार ते पाच दिवस ज्वालामुखी लाव्हारस बाहेर फेकत राहील असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सध्या लाव्हारस 200 मीटर प्रतितास या गतीने पुढे सरकत आहे.

दोन दिवसात ज्वालामुखीतून 706 मिलियन क्यूबिट फूट अर्थात 2 हजार कोटी किलोग्राम लाव्हा पृथ्वीच्या गर्भातून बाहेर फेकला गेला आहे.

ज्वालामुखीचा विस्फोट होण्यापूर्वी या भागात 4 हजारांहून अधिक छोटे भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर प्रशासनाने ज्वालामुखीचा कधीही विस्फोट होऊ शकतो असा इशारा नागरिकांना दिला होता.

spain la palma volcano eruption letest news

स्पेनच्या कॅनरी आयलंडमधील पाल्मा (Canary Island) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे आणि हा लाव्हारस सध्या इथल्या अलिशान घरांमध्ये घुसू लागला आहे. नागरिक याचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहेत.

केनरी आयलंडमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांना घरं रिकामी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरं तर ही जागा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या जागेचा विकास झाला असून अनेकांनी इथं अलिशान घरं उभारली आहेत. आता या घरांमध्ये लाव्हारस घुसत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

रस्त्यावर गरमागरम लाव्हा वाहत आहे. घरातील रिकाम्या जागांवर लाव्हा साठत आहे.अलिशान घरांचं यामुळे पूर्ण नुकसान होत आहे. स्विमिंग पूलमध्ये हा लाव्हारस जाऊन पडल्यानंतर पाण्याला उकळी फुटल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. आपल्या घरात आणि अंगणात लाव्हा आल्याचे व्हिडिओ नागरिक शेअर करत आहेत. मात्र नागरिकांनी या परिसरातून दूर जावं अशा सूचना प्रशासनानं केल्या आहेत.

पहा ज्वालामुखीचे थरकाप उडवणारे दृश्य