(Earthquake in Jamkhed politics ) सोमवारी जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप  : भाजपाचे अनेक पदाधिकारी देणार राजीनामे

भाजपच्या कार्यकर्ता बैठकीवर राजीनाम्याचे सावट

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद डावलल्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाराज भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. जामखेड तालुक्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंडेप्रेमी कार्यकर्ते व नेत्यांनी मुंडे भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.(Earthquake in Jamkhed politics on Monday: Many BJP office bearers will resign)

 

बीडच्या खासदार डाॅ प्रीतम मुंडे (Beed MP Dr. Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने राज्यातील मुंडे समर्थकांमध्ये उसळलेली संतापाची लाट आता थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मुंडे भगिनींना भाजपात सातत्याने डावलले जात असल्याने चिडलेल्या मुंडे समर्थकांनी आपापल्या पदांचे राजीनामे देण्याचा धडाका लावला आहे. याची पहिली ठिणगी पडली ती बीड जिल्ह्यात. बीडमधील ११ तालुक्याध्यक्षांसह २५ ते ३०  पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनामा नाट्याचे लोण अहमदनगर जिल्‍ह्यात पसरले आहे. पाथर्डीतील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर जामखेड (jamkhed)तालुक्यात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत..(Earthquake in Jamkhed politics on Monday: Many BJP office bearers will resign)

रविवारी दिवसभर मुंडे समर्थकांनी राजीनामा देण्यासंबंधीची मोहीम राबवली. खर्डा भागातील भाजपाचे युवा नेते बाजीराव गोपाळघरे यांनी ज्यांना राजीनामे द्यायचे आहेत त्यांनी वाॅट्सअपवर कळवावे असे अवाहन केले होते. त्यानुसार सायंकाळी आठ वाजेपर्यंत ३० ते ४० महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून गोपाळघरे यांच्याकडे राजीनामे देणार असल्याचे कळवले आहे अशी माहिती समोर येत आहे. सोमवारी जामखेड तालुक्यातील मुंडे समर्थक कार्यकर्ते व नेते सामूहिकपणे आपले राजीनामे पक्षाकडे सादर करणार आहेत..(Earthquake in Jamkhed politics on Monday: Many BJP office bearers will resign)

सोमवारी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे व भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे (Former Minister Prof. Ram Shinde and BJP South District President Arun Munde ) यांच्या उपस्थितीत जामखेड खर्डा रोडवरील केशर हॉलमध्ये कार्यकर्ता बैठक पार पडणार आहे .या बैठकीवर आता मुंडे समर्थकांच्या राजीनामा अस्राचे सावट घोंगावू लागले आहे. उद्या भाजपाचे किती मुंडे समर्थक कार्यकर्ते व नेते आपले राजीनामे पक्षाकडे सोपवणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. .(Earthquake in Jamkhed politics on Monday: Many BJP office bearers will resign)