(Devdaithan firing incident) गोळीबाराच्या घटनेने देवदैठण हादरले; एकाचा मृत्यू (Devdaithan firing)
श्रीगोंदा तालुक्यातील शिरूर - बेलवंडी मार्गावरील थरार(Devdaithan firing)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. पारनेर) येथील रहिवासी पाडूरंग जयवंत पवार (वय ५२) या व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची थरारक घटना श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे घडली आहे. (Devdaithan firing incident )
या प्रकरणात दोघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वैयक्तीक कारणातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.(Devdaithan firing incident )
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण गावातून जाणाऱ्या शिरुर, बेलवंडी रस्त्याच्या कडेला जयवंत पवार यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आज आढळून आला. पवार यांच्या डोक्यात पाठीमागच्या बाजूने मारेकऱ्यांनी गोळी घातली आहे. गोळी आरपार गेल्याने पवार यांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे.(Devdaithan firing incident )
दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेलवंडी पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे. या प्रकरणात दोघा संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ व एका हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांकडून वेगाने तपासले जात आहे.पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले. (Devdaithan firing incident ) या बाबतचे वृत्त साम टीव्ही ने दिले आहे.