( Jamkhed Corona Update) चिंताजनक : रविवारी पुन्हा रूग्ण वाढले, वाचा कुठे किती रूग्ण ?

(Jamkhed Corona Update)आजदिवसभरात - ५६५ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या तर ४४२ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसु लागले होते. शनिवारी थंडावलेला कोरोना रविवारी पुन्हा वाढला आहे.(Jamkhed Corona Update)रविवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात एकुण २५ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. (Jamkhed Corona Update)

आरोग्य विभागाने रविवारी दिवसभरात ५६७ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये यामध्ये ११ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर RTPCR तपासणी अहवालात १४ रूग्ण आढळून आला आहेत. आज दिवसभरात आरोग्य विभागाने ४४२ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. (Jamkhed Corona Update)

आज आढळून आलेल्या नवीन कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहर ०१,  आपटी ०१, सारोळा ०१,भुतवडा ०१, महारूळी ०२,भुतवडा ०१, अरणगाव ०१, देवदैठण ०१, शिऊर ०२, तेलंगशी ०१, चौंडी ०१ या ११ रूग्णांचा समावेश आहे.  RTPCR तपासणी अहवालात तेलंगशी ०३, बोरला ०३, जामखेड ०१, महारूळी ०२, धोतरी ०१, पोतेवाडी ०१, देवदैठण ०१, शिऊर ०२ या १४ रूग्णांचा समावेश आहे. त्यानुसार रविवारी दिवसभरात एकुण २५ नवे कोरोनाबाधित रूग्ण जामखेड तालुक्यात आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली. (Jamkhed Corona Update)

उद्या सोमवार दिनांक १२/७/२०२१ रोजी सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध होणार आहे - डाॅ. संजय वाघ,वैद्यकीय अधीक्षक डॉ जामखेड