शहाजी राजेभोसले यांच्या खांद्यावरच दुसर्‍यांंदा तालुकाध्यक्षपदाची धुरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी शहाजी राजेभोसले यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक कैसर आझाद, अँड. कैलास शेवाळे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी ही निवड जाहीर केली. (Shahaji Rajebhosle elected Jamkhed Congress taluka president for the second time)

शनिवारी जामखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली.या बैठकीत जामखेड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. शहाजी राजेभोसले यांच्या खांद्यावरच दुसर्‍यांंदा तालुकाध्यक्षपदाची धुरा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे यांचे कट्टर समर्थक म्हणून शहाजी राजे भोसले यांची राजकारणात ओळख आहे.यावेळी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.