पश्चिम व उत्तर महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने मंगल भुजबळ यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन

अहमदनगर –  पुणे व नाशिक येथे होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात आखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या सहसमन्वयक व राजस्थान प्रदेश कॉंग्रेसच्या सहप्रभारी म्हणून मंगल भुजबळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल पश्चिम व उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing public felicitation ceremony for Mangal Bhujbal on behalf of West and North Maharashtra Congress

पुणे येथे आज काँग्रेस भवनात कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हा सत्कार होणार आहे. तर उद्या 18 रोजी नाशिक येथील काँग्रेस भवनात सकाळी 10 वाजता उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने मंगल भुजबळ यांचा सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमासाठी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री कॅप्टन अजयसिंग यादव कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व कॉंग्रेस विधिमंडळ गटनेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,कॉंग्रेसच्या महाराष्ट्राच्या  सहप्रभारी सोनल पटेल, राहूल यादव, शीतल चौधरी, कॉंग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.