सचिन पोटरेंचा नामदेव राऊतांवर जोरदार हल्लाबोल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ज्यांना राम शिंदेंनी पक्षात महत्वाचे स्थान दिले होते,  तेच आता तिकडे जाऊन साधे कार्यकर्ते झाले आहेत असे म्हणत सचिन पोटरे यांनी नामदेव राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. (Sachin Potare strongly criticizes Namdev Raut)

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या सर्वच नेत्यांनी जोरदार बॅटिंग केली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवार व नामदेव राऊत यांच्याविरोधात कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले.

सचिन पोटरे पुढे म्हणाले, चिल्लर कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी बंदा रुपया केला, मात्र तिकडे जाताच ते थिल्लर झाले आहेत असे सांगत राम शिंदे यांनी मंत्रीपदाच्या माध्यमांतून नगरपंचायतला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलला मात्र विद्यमान आमदारांनी दोन वर्षात केवळ आश्वासने दिली; काम मात्र काहीच केले नाही अशी घणाघाती टीका सचिन पोटरे यांनी केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे म्हणाले की, तुम्ही आजोबांच्या नावावर राजकारण करीत आहे मी स्वताच्या जीवावर राजकारण करीत असल्याचे सागर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी आमदार रोहित पवार यांना चांगलेच फटकारले.

विधानसभा निवडणुकीला सगळ्यानाच मस्ती आली होती. मात्र ती मतदारसंघाच्या चांगलीच अंगलट आली आहे. मात्र यंदाच्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत त्यांना बिन दाव्याची फाशी देऊ असे म्हणत उपस्थित जनसमुदायास भाजपाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत काही करा पण प्रभाग क्रमांक १२ मध्ये त्यांची जिरवा. भाजपाचा वाघ तिकडे जाऊन मांजर झाल्याचे जनता पाहत आहे असे म्हणत जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ (Aambadas Pisal) यांनी नामदेव राऊतांवर जोरदार हल्ला चढविला.

यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या, माजी मंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील सह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.