Ram Shinde News : जनसंवाद पदयात्रेत आमदार राम शिंदेंची तुफान फटकेबाजी, रोहित पवारांना धु धु धुतले !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । मी जलसंधारण मंत्री असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात (Karjat-Jamkhed Constituency) जलयुक्त शिवारची प्रचंड कामे केली.या कामांची विरोधकांनी SIT चौकशी लावली.पण त्यात काहीच आढळले नाही. आपण केलेल्या याच जलसंधारण कामांची साळसुळ करून त्यांनी सीएसआरचे (CSR) पैसे हडपले.आता याच कामांची मी चौकशी लावणार आहे, असा इशारा आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिला.

MLA Ram Shinde's stormy lashing in Jan Samswad Padayatra, MLA Ram Shinde strongly attacked Rohit Pawar, karjat jamkhed latest news

आमदार प्रा राम शिंदे यांची कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या जनसंवाद पदयात्रा सुरु आहे. या यात्रेच्या पहिला टप्पाची सांगता जामखेड तालुक्यातील जवळा येथे झाली. जवळा ग्रामस्थांनी समता नगर येथे आमदार राम शिंदे यांच्या पदयात्रेचे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केले. त्यानंतर जवळा बसस्थानकापर्यंत वाजत गाजत अन् फटाक्यांची आतिषबाजी करत ही पदयात्रा गेली. ठिकठिकाणी पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सांगता सभा पार पडली. यावेळी आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde) बोलत होते.

जामखेडला कुकडीचे पाणी मीच आणणार – Ram Shinde

आमदार शिंदे म्हणाले की, जवळा परिसराच्या विकासासाठी मंत्री असताना २८ कोटी तर विधानपरिषदेवर गेल्यावर २२ कोटींचा निधी दिलाय, मागच्या निवडणुकीत जी चुक झाली ती यंदा करू नका, मतदारसंघातील जनतेवर कधीच अन्याय होऊ देणार नाही, आमदार राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना जनतेतून सतत कुकडीच्या पाण्यावर बोला असा आवाज यायचा, त्यावर बोलताना ते म्हणाले कुकडीचे शेतीसाठी पाणी जामखेड तालुक्यात आणू म्हणणार्‍यांनी मागच्या पाच वर्षात कुकडीचे नाव सुद्धा काढले नाही. पण तुमचा हा हक्काचा भूमिपुत्र राम शिंदेच (Ram Shinde) कुकडीचे पाणी जामखेडला आणून दाखवीन, असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

सगळे मिळून येणाऱ्या विधानसभेत आपण समोरच्याचा कार्यक्रम करू

हा कार्यकर्ता तुमच्यासाठी संघर्ष करणारा आहे. वेळप्रसंगी कोणतीही भूमिका घेणारयं, माझ्या कार्यकर्त्यावरती, शेतकऱ्यांवरती, मतदारसंघातील जनतेवरती, अन्याय अत्याचार होणार नाही याची पुर्णता: खबरदारी घेणारा हा तुमचा राम शिंदे आहे, मतदारसंघाला पहिले मंत्री म्हणून स्वर्गीय आबासाहेब निंबाळकर मिळाले, पण स्वातंत्र्यानंतर जामखेड तालुक्याला पहिला मंत्री होण्याचा मान तुमच्या आशिर्वादाने मला मिळालाय.

त्यामुळे मी कधी कोणाला माझा तुझा केलं नाही ,सर्वांचा मानसन्मान राखला, मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी अहोरात्र झटत राहिलो. पण २०१९ ला माझा कार्यक्रम झाला, माझ्याबरोबर सर्वांचाच कार्यक्रम झाला, पण आता आपण सगळे मिळून येणाऱ्या विधानसभेत समोरच्याचा कार्यक्रम करू, परकीय अतिक्रमण हुसकावून लावावं लागेल, त्यासाठी भूमिपुत्राला साथ द्या अशी भावनिक साद यावेळी शिंदे (Ram Shinde) यांनी घातली.

कोणीही माझ्याजवळ आला तरी तो माझ्यासाठी देवच

जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून विरोधकांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. पण मी कार्यकर्त्यांना कमी लेखणारा माणूस नाही, मी नेहमी कार्यकर्त्यांचा सन्मान राखतो,कोणीही माझ्याजवळ आला तरी तो माझ्यासाठी देवच असतो, माझ्यासाठी माझा मित्र असतो, भाऊ असतो, पुतण्या असतो, मी त्याचा सदैव सन्मान करतो. पण ज्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्यांची तुम्ही हेटाळणी करता, कुठलेही अपशब्द वापरता, असे म्हणत आमदार शिंदे (Ram Shinde) यांनी रोहित पवारांचा खरपुस समाचार घेतला

रोहित पवारांनी घडवून आणलेल्या पक्ष प्रवेशाची राम शिंदेंनी उडवली खिल्ली

कर्जत-जामखेड मतदारसंघातील काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षातील नेत्यांनी रोहित पवारांच्या उमेदवारीला ओपन विरोध केला. जामखेड शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय (काका) काशिद यांनी तर तालुक्यातील अख्खी कार्यकारणीच बरखास्त केली आणि भाजपात प्रवेश केला. याला म्हणायचं पक्ष प्रवेश, मधुकर (आबा) राळेभात यांनी राष्ट्रवादीतून थेट भाजपात प्रवेश केला, याला म्हणायचं पक्ष प्रवेश. अरे चार चार वर्षे तुमच्या बरोबर जी माणसं फिरतायेत त्यांचाच पक्ष प्रवेश घडवून आणला तुम्ही, बाळासाहेब साळुंके काँग्रेसमधून राष्ट्रवादीत, मंगेश आजबे स्वाभिमानीतून राष्ट्रवादीत, त्यांचीच माणसं आणि त्यांचाच प्रवेश, दबाव नाही उलालही नाही, असे म्हणत आमदार शिंदे (Ram Shinde) यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी खर्ड्यात घडवून आणलेल्या पक्ष प्रवेशाची खिल्ली उडवली.

अरे बाबु, पिंट्या, बबल्या तुला निवडून आणणारे तुला सोडून का गेले ?

मला वाटलं शरद पवार साहेब आपल्या नातवाला विचारतील की, अरे बाबु, पिंट्या, बबल्या तुला निवडून आणणारे प्रा मधुकर (आबा) राळेभात, प्रविण दादा घुले, राजेंद्र गुंड, काकासाहेब, तापकीर, नानासाहेब निकत, परमवीर पांडुळे हे सगळे तुला सोडून का गेले, पण तसं काही घडलं नाही, ते म्हणले आजोबा आजोबा फाटलं असतं तर शिवलं असतं, पण डोंबरं पडलयं, शिवतोयं तरी इगरतयं, म्हणून आता आपल्याच मित्रपक्षातील माणसांचा आपल्या पक्षात प्रवेश घडवून आणू, असा टोला यावेळी शिंदे (Ram Shinde) यांनी लगावला.

पवार साहेबांनी राजशिष्टाचार सांगायला हवा होता

शिंदे पुढे म्हणाले, पवार साहेब तुम्ही पाच सहा दशकापासून देशाच्या राजकारणात आहात, कुसडगाव एसआरपीएफ सेंटरच्या बाहेर लोकप्रतिनिधींनी घातलेला धिंगाणा, राडा, स्टंट हा चुकी आहे की बरोबर आहे? राजशिष्टाचार काय असतो हेच तुम्ही राज्यातील जनतेला सांगा, अशी मागणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने केली होती, पण पवार साहेबांनी त्यावर उत्तर दिलं नाही, पण जाताना ते म्हणाले कामामध्ये अडथळे आणू नका.

कोणत्या अधिकारात आणि नियमात तुम्ही कुसडगाव एसआरपीएफ सेंटरला गेला होतात हे जनतेला सांगा

आता माझा स्वभाव अडथळे आणायचा असता तर २०१९ ला पडलो असतो का हो ? असे म्हणत शिंदे पुढे म्हणाले की, पवार साहेब तुम्हाला माहित आहे की, आपल्या नातवाचा पुरता बाजार उठला आहे, प्रश्न सोडून तुम्ही इतर विषयांवर बोललात, दोन पक्षांमध्ये जर प्रश्न निर्माण झाला तर जेष्ठांनी त्यावर बोलायचं असतं, पण तसे काही घडले नाही. पवार साहेब कुसडगाव प्रकरणावर काहीच बोलले नाहीत. पण आमदार म्हणतात की आमची मुलं तिथं पाहायला जाणार होते. अरे पण तुला शिष्टाचार कळतो की नाही, तिथे जायची परवानगी का घेतली नाही? कोणत्या अधिकारात आणि कोणत्या नियमात तुम्ही तिथे गेला होतात हे आता जनतेला समजायला हवेत, अशी मागणी शिंदे (Ram Shinde) यांनी केली.

ह्यो तर मांढूळ आहे मांढूळ, तिकडं गेलं की एक बोलतो आणि इकडं आलं की एक बोलतो

लाडकी बहिण योजनेत आपल्या मतदारसंघातील एक लाख लाडक्या बहिणींचा समावेश आहे. लाडकी बहिण सुरु होऊ नये याकरिता सावत्रभाऊ कोर्टात गेला, त्याने सभागृहात योजनेला विरोध केला.पण खर्ड्याच्या भाषणात तो म्हणला पगार चालू ठेवीन, ह्यो तर मांढूळ आहे मांढूळ, तिकडं गेलं की एक बोलतो, इकडं आलं की एक बोलतो, सावत्रभावाने कितीही आदळ आपट करू द्या लाडकी बहिण योजना सुरुच राहणार आहे, महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर दीड हजाराचे तीन हजार करणार, असे शिंदे (Ram Shinde) यांनी यावेळी स्पष्ट करत रोहित पवारांचा समाचार घेतला.

ज्यांनी आपली पीकं जाळण्याचे पाप केलं त्यांना धडा शिकवा

महाविकास आघाडीच्या काळात वीज बील नाही भरलं की डिप्या उतरवायचे, आपली पीकं जाळण्याचे पाप त्यांनी केलं. आमदाराला फोन केला की ते म्हणायचे तुम्हाला बीले भरायची सवय पाहिजे, नियम कळाला पाहिजे, डिपी जळाली तर त्यांना फोन केला तर ते म्हणायचे मी काय वायरमन आहे का? पण आता आपल्या महायुती सरकारच्या काळात वीज बील मागितलं जात नाही, डिपी जळाली की लगेच आणून बसवते. महाविकास आघाडीवाल्यांनी दिलेल्या त्रासाचा हिशोब चुकता करण्याची आता वेळ आली आहे, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.