जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | BJP leader Namdev Raut announces to quit BJP | राज्याच्या राजकारणात शिवसेना भाजप यांचा कलगीतुरा रंगलेला असतानाच आता कर्जत – जामखेड मतदारसंघातही भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा कलगीतुरा रंगला आहे. एकिकडे माजी मंत्री राम शिंदे (Former Minister Ram Shinde) हे मतदारसंघात सक्रीय होऊन आक्रमकपणे आमदार रोहित पवारांविरोधात (MLA Rohit Pawar) आरोपांच्या फैरी झाडू लागल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. यामुळे मतदारसंघात सध्या रोहित पवार विरूध्द राम शिंदे संघर्ष उफाळून आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने राम शिंदे यांच्या दुखऱ्या नसेवर घाव घालत थेट भाजपलाच भगदाड पाडण्याचा धडाका लावला आहे. यामुळे भाजप पुरती घायाळ झाली आहे. सध्या राजकीय भूकंपाने कर्जत तालुका हादरून गेला आहे.
मागच्या आठवड्यात भाजपच्या प्रसाद ढोकरीकर या महत्वाच्या नेत्याने काही नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर शनिवारी 18 रोजी पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली. कर्जत भाजपाचे नेते तथा नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत (BJP leader Namdev Raut) यांनी भाजपला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे.एकुणच राऊत हेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट आहे. परंतु त्यांनी अजूनही तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
माजी मंत्री राम शिंदे यांचे जवळचे सहकारी आता शिंदेंची साथ सोडत असल्याने शिंदे यांना मोठा दणका बसला आहे. भाजपमधील महत्वाचे नेते पक्ष सोडून जात असल्याने आता खऱ्या अर्थाने भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.भाजपा नेते नामदेव राऊत हे 2019 च्या विधानसभेसाठी इच्छुक होते. त्या आधीच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी केलेली आहे. 2019 च्या निवडणुकीवेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.परंतु पक्षाने त्यांना शांत करत बंडखोरी टाळली होती. विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आणि भाजपच्या नेत्यांनी राम शिंदेची साथ सोडण्याचा धडाका लावला आहे. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
सध्या राजकीय भूकंपाचे केंद्र कर्जत तालुका आहे. अगामी काळात जामखेड तालुक्यातही राजकीय भूकंप होऊ अशीही चर्चा कार्यकर्ते दबक्या आवाजात करताना दिसतात. त्यामुळे अगामी काळात भाजपला आणखी किती भगदाड पडणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
भाजपा नेते नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपात सर्वकाही आलबेल आहे अशी काही स्थिती नाही. पक्षांतराची लाट थोपवण्यासाठी राम शिंदेंना आता जोरदार कंबर कसावी लागणार आहे. राष्ट्रवादीने भाजपला भगदाड पाडण्याची उघडलेली मोहिम कुठे जाऊन थांबणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अगामी नगरपंचायत, नगरपरिषद व जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराच्या हादऱ्याने सध्यातरी बॅकफूटवर गेली आहे. येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला जीवाचे रान करावे लागेल हे मात्र निश्चित. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
नामदेव राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले ?
काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रसाद ढोकरीकर व दोन नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झालेले आहेत. त्याअगोदर पासून भाजपाचा एक मोठा कर्जतमधील नेता राष्ट्रवादीत दाखल होणार आहे. अशी चर्चा होती. ती चर्चा आता खरी ठरत आहे. प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले नामदेव राऊत यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याने शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
भाजपाचे नेते नामदेव राऊत यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जतमध्ये अनेक विकासकामे होत आहेत. त्यांच्याशी माझी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे राऊत यांनी कर्जत येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेप्रमाणे मी अनेक वर्ष काम केले. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून काम केले. त्या माध्यमातून योग्य व भरीव काम करण्याचा प्रयत्न केला. भाजपामध्ये कर्जत शहरापासून ते जिल्ह्यापर्यंत अनेक वेगवेगळे जीवाचे मित्र मिळाले. विचारांची देवाणघेवाण झाली त्यातून खूप काही शिकण्यास मिळाले.भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना संघटनात्मक कौशल्य कसा असावे, कोणत्या पद्धतीने काम करावे हे शिकण्यास मिळाले. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
प्रा. राम शिंदे यांच्याबरोबर दहा बारा वर्षे काम केले. विकासात्मक विषयाबाबतीत त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळाले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही अतिशय चांगल्याप्रकारे सहकार्य केले. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अनेक विषयावर मार्गदर्शन मिळाले. माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्याबरोबर काम करताना नेहमी एक सकारात्मक दृष्टीने काम करण्याचा अनुभव मिळाला. (BJP leader Namdev Raut announces to quit BJP)
स्वर्गीय माजी मंत्री दिलीप गांधी व सुवेंद्र गांधी यांनीही चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. अॅड. अभय आगरकर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. कर्जत तालुक्यातील भाजपाच्या अनेक मित्रांनी माझ्या राजकीय दृष्टीने नेहमी सहकार्य करण्याचे काम केले. भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य व सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा होणार आहेत. परंतु माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कामाबद्दल व त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी समाधानी आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी राऊत यांनी आभार मानले.
web title: BJP leader Namdev Raut announces to quit BJP