Kisan Credit Card Scheme | देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागु होणार ‘ही’ योजना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था । Kisan Credit Card Scheme will be applicable to all farmers in India | केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card ) देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी (Prime Minister Narendra Modi birthday) केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेली माहिती म्हणजे एकप्रकारे देशातील शेतकऱ्यांसाठी मोदींचे गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना महामारीच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करण्यात आले होते.सरकार गेल्यावर्षीपासूनच (Kisan Credit Card Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना सामावून घेत आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने (kisan credit card benefits) झाली पाहिजे आणि यामध्ये पैशांची कमतरता अडथळा बनू नये.केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असे ते म्हणाले. (Kisan Credit Card Scheme will be applicable to all farmers in India)
किसान क्रेडिट कार्ड योजना Kisan Credit Card फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के (kisan credit card interest rate) असले तरी सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यामुळे कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते.
कुणाला मिळेल Kisan Credit Card Scheme ?
शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी कोणतीही व्यक्ती, जरी ती दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल तरीही याचा लाभ घेऊ शकते. (pm kisan credit card status) याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आहे.जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सह अर्जदार देखील आवश्यक असेल, ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे. शेतकऱ्याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी तो या योजनेस पात्र आहे की नाही हे तपासून पाहिल.
कशाप्रकारे मिळवाल Kisan Credit Card ?
How to Apply for Kisan Credit Card Scheme मिळवणे सोपे आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा. (Kisan Credit Card Form Download) तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल. (Kisan Credit Card Scheme will be applicable to all farmers in India)
Kisan Credit Card Scheme साठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
आयडी प्रूफसाठी तुमच्याकडे वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तर ॲड्रेस प्रूफ म्हणून देखील मतदानकार्ड voter ID card/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
web title: Kisan Credit Card Scheme will be applicable to all farmers in India