Big political earthquake in Punjab | पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप  : मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुख्यमंत्र्यांनी सांगितले राजीनाम्याचे कारण

नवी दिल्ली –  गेल्या काही महिन्यांपासून पंजाबच्या राजकारणात शीतयुद्ध रंगले आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षातील हे शीतयुद्ध आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Big political earthquake in Punjab, Chief Minister resigns)

पंजाबचे मुख्यमंत्री  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीआधी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची निवासस्थानी बैठक घेतली होती. चंदिगढमधील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांच्या बाजुने असलेल्या आमदारांनी उपस्थिती लावली होती. तसंच सायंकाळी त्यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती. (Big political earthquake in Punjab, Chief Minister resigns)

काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला. सिंग यांच्या निर्णयामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. (Big political earthquake in Punjab, Chief Minister resigns)

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय भवितव्याविषयी देखील सूतोवाच केले. मात्र, त्याआधी त्यांनी काँग्रेस हायकमांडविषयी देखील नाराजी व्यक्त केली. “मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितल होतं की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हे होतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटतं की माझ्यावर त्यांना संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय”, असं अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावं, अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. “दोन महिन्यांत तीन वेळा तुम्ही आमदारांना दिल्लीला बोलवलं. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील. जे काही कारण असेल, त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला. ठीक आहे”, असं ते म्हणाले.

 

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खुद्द अमरिंदर सिंग यांनी याविषयी स्पष्ट अशी कोणती भूमिका मांडली नाही. मात्र, तरीदेखील त्यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीविषयी सूचक विधान केलं आहे. “माझ्याकडे भावी वाटचालीसाठी नेहमीच पर्याय असणार आहेच. त्याविषयी मी भविष्यात निर्णय घेईन. मला 52 वर्ष राजकारणात झाली आहेत. त्यातली 9.5 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि नंतर पुढचा निर्णय घेईन”, असं ते म्हणाले.